IMPIMP

Jalna Crime | जालन्यात पोलिसांचा हवेत गोळीबार, 5 पोलीस जखमी ! दोन गटातील राड्यानंतर 250 जणांवर गुन्हे

by nagesh
Jalna Crime | jalna bhokardan chandai news mess and stone on police

जालना : सरकारसत्ता ऑनलाइनJalna Crime | दोन गटात तुफान हाणामारी झाल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या चांदई गावामध्ये घडली आहे. हा वाद गावातील कमानीला नाव देण्यावरुन पेटला होता. यावेळी हिंसक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. (Jalna Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दगडफेकीत 5 पोलीस जखमी
यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत 5 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलिस व्हॅन, जीप, अग्निशमन दलाच्या गाड्यांची जमावाने तोडफोड केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावचा सरपंच आणि उपसरपंचासह 18 जणांना अटक केली आहे. पोलिसांवर दगडफेक करणार्‍या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. (Jalna Crime)

काल चांदई गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा असलेल्या कमानीला नाव देण्यावरून दोन गटात वाद झाला. यानंतर वाद वाढल्याने दोन्ही गटात तुफान दगडफेक झाली. प्रकरणाची माहिती देताना प्रभारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, गावात तणावपूर्ण शांतता असून आता स्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, गावात अनधिकृतपणे उभारलेला शिवरायांचा पुतळा आणि कमान काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एकुण 250 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करणार्‍या आरोपींचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही युवक रस्त्याच्या कडेला दगड हातात घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. समोरुन येणारी पोलिस व्हॅन जवळ येताच हे युवक व्हॅनवर दगडफेक करताना दिसत आहेत. दगडफेक होताच पोलिसांची ती व्हॅन वेगाने पुढे जाते.

Web Title :- Jalna Crime | jalna bhokardan chandai news mess and stone on police

हे देखील वाचा :

Multibagger Penny Stock | ‘या’ पेनी स्टॉकमध्ये लागले अपर सर्किट, झटक्यात 1 रुपयावरून वाढून 8 रुपये झाला शेअर; गुंतवणुकदारांना 558% रिटर्न

Monsoon 2022 Update | गुड न्यूज ! यावर्षी मान्सून येणार 5 दिवस आधीच, हवामान विभागाने वर्तवला अंदाज; महाराष्ट्रात 20 मेनंतर पावसाचा इशारा

How To Live A Long Life | दीर्घायुष्य पाहिजे तर सेवन करा ‘या’ गोष्टी, शास्त्रज्ञांनी सांगितला निरोगी जीवनाचा फार्म्युला; जाणून घ्या

Sanjeevani Karandikar | बाळासाहेब ठाकरे यांची लहान बहीण संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात निधन; अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता

Related Posts