IMPIMP

Jan Dhan Accounts | खुशखबर ! SBI च्या ‘या’ ग्राहकांना मोफत मिळताहेत 2 लाख रूपये, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

by nagesh
 JanDhan Account | how to jan dhan account transfer in sbi saving account know process


नवी दिल्ली : वृत्तसंस्था
Jan Dhan Accounts | जर तुम्ही भारतीय स्टेट बँक (State Bank of India-SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा मोफत इन्श्युरन्स (Free insurance) देत आहे. एसबीआयची ही सुविधा जनधन खातेधारकांना (Jan Dhan Accounts) मिळत आहे. ज्या ग्राहकांकडे रुपे (RuPay) डेबिट कार्ड आहे, त्यांना एसबीआय 2 लाख रुपयांपर्यंत मोफत आकस्मिक विमा कव्हर देते.

रूपे डेबिट कार्डचा वापर करणार्‍यांना मृत्यू विमा, खरेदी सुरक्षा कव्हर आणि इतर लाभ मिळतात. जनधन अकाऊंट (Jan Dhan Accounts) खातेधारक मोफत इन्श्युरन्सचा लाभ घेऊ शकतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

जाणून घ्या कसा करावा क्लेम?
योजनेंतर्गत व्यक्तिगत दुर्घटना पॉलिसी भारताच्या बाहेर झालेली घटना सुद्धा कव्हर करते. आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर विमा रकमेनुसार भारतीय रुपयात क्लेमचे पेमेंट केले जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारस खात्यात नॉमिनी होऊ शकतो.

ट्रान्सफर करण्याचा सुद्धा आहे पर्याय
बेसिक सेव्हिंग अकाऊंट (Savings Account) जनधन योजना खात्यात ट्रान्सफर करण्याचा सुद्धा पर्याय आहे. ज्यांच्याकडे Jan Dhan Accouts आहे, त्यांना बँकेकडून RuPay PMJDY कार्ड मिळते.

28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जनधन खात्यावर जारी RuPay PMJDY कार्डची विमा रक्कम 1 लाख रुपये असेल. 28 ऑगस्ट 2018 च्या नंतर जारी रूपे कार्डवर 2 लाख रुपर्यापर्यंतचे अ‍ॅक्सीडेंटल कव्हर बेनिफिट मिळेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

2014 मध्ये सुरू झाली होती योजना
पंतप्रधान जनधन योजना (PMJDY) सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक प्रोग्राम आहे जो बँकिंग/बचत तसेच जमा खाते, प्रेषण, कर्ज, विमा, पेन्शनपर्यंत लाभ देते.
हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आऊटलेटमध्ये उघडले जाऊ शकते.
पीएमजेडीवाय खाते झीरो बॅलन्ससह उघडले जात आहे.

Web Title :- Jan Dhan Accounts | sbi to gives jandhan account holder 2 lakh rupees free insurance check details

हे देखील वाचा :

Gold Price Today | धनत्रयोदशी 2021 पूर्वी सोने झाले 1100 रुपये महाग, चांदीत 4900 रुपयांची तेजी

IND vs NZ : विराट कोहलीने शमीला ट्रोल करणार्‍यांना फटकारले, म्हणाला – ‘धर्मावरून निशाणा बनवणे तुच्छता’

Gold Demand | गतवर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याच्या मागणीत ‘इतकी’ वाढ; जाणून घ्या

Related Posts