IMPIMP

Jayant Patil | जयंत पाटलांनी केली पदाधिकार्‍यांची कान उघडणी, कुणाकुणाची अब्रू घालवणार, चोपडा मतदारसंघ सोडून द्यायचाय का?

by nagesh
Jayant Patil On President Rule In Maharashtra | If there is no mid-term elections in Maharashtra, there is a possibility of imposition of President's rule, claims Jayant Patil

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन –  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जळगाव येथील पक्षाच्या कार्यालयात
आढावा बैठक घेतली. यावेळी चोपडा मतदार संघाचा (Chopra Assembly Constituency) आढावा घेताना पदाधिकार्‍यांची गटबाजी आणि हेवेदावे
पाहून जयंत पाटील (Jayant Patil) भडकले आणि त्यांनी सभासद नोंदणी वरून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सुनावले. यावेळी अरुण गुजराथी (Arun
Gujarati) देखील होते. चोपडा मतदारसंघ सोडून द्यायच्या आहे का? असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, चोपडा मतदारसंघात विधानसभा लढवायची की सोडायची? चोपडा तालुक्यात इतके कमी सभासद असतील तर कसे होणार? अरुण गुजराथी असताना एवढी कमी संख्या कशी? कुणाकुणाची अब्रू घालवणार आहात तुम्ही? चोपडा मतदारसंघात यावलचे तीन जि.प. गट येतात. आपल्याला विधानसभा लढवायची आहे की सोडायची आहे. आता तर तिथे आमदारही नाही, अशा शब्दांत त्यांनी पाणउतारा केला.

यानंतर जयंत पाटील यांना प्रश्न विचारला की, आपले उमेदवार वळवी आले आहेत का? मात्र वळवी उपस्थित नसल्याचे समजताच जयंत पाटील संतापले. त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना थेट प्रश्न विचारला की, ते आपल्या पक्षात आहे का? वळवी सभासद नोंदणीला मदत करत आहेत का? मात्र जयंत पाटील यांच्या प्रश्नावर तालुका अध्यक्ष काहीच बोलले नाहीत.

दरम्यान, धुळ्यात सुद्धा जयंत पाटलांना असाच अनुभव आला. तिथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गटबाजी त्यांच्या समोरच उफाळून आली होती. राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे (Anil Gote) यांचा बॅनरवर फोटो न लावल्याने गोटे समर्थकांनी गोंधळ घातला. अनिल गोटे समर्थक कार्यकर्त्यांनी राडा घातला. जयंत पाटील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने हा चर्चेचा विषय झाला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Jayant Patil | jayant patil get angry on office bearers in chopda jalgaon

हे देखील वाचा :

Pune Crime | बांगलादेशातून बनावट नोटा आणून तस्करी करण्याचा प्रयत्न, खडकी बाजार परिसरातून तिघांना अटक

T20 World Cup | पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम मॅनेजमेंट ‘या’ विकेटकीपरला देणार संधी

Pune Crime | दाजीने घेतलेले पैसे परत करण्यासाठी तरुणाचे अपहरण करुन केली मारहाण; जबरदस्तीने स्टँपपेपरवर सही घेऊन मोटारसायकल घेतली काढून

Related Posts