IMPIMP

Jayant Patil | संभाव्य महायुतीवरून राष्ट्रवादीचे भाजपावर टीकास्त्र, जयंत पाटील म्हणाले – टआपण एकमेकांना पुरणार…

by nagesh
Jayant Patil On President Rule In Maharashtra | If there is no mid-term elections in Maharashtra, there is a possibility of imposition of President's rule, claims Jayant Patil

शिर्डी : सरकारसत्ता ऑनलाइन –  सरकारने जनतेच्या हिताची कामे करावी. मुंबईत गणपती उत्सवात ज्या जाहिराती केल्या होत्या त्यावेळी सर्वच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) – देवेंद्र फडणवीस यांचे (Devendra Fadnavis) एकत्रित फोटो होते. मात्र दिवाळीच्या ज्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यात एकनाथ शिंदे यांचा फोटो कुठेच दिसत नाही. फक्त भाजप (BJP) नेत्यांचे फोटो आहेत. त्याची नोंद शिंदे घेतील अशी अपेक्षा आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला. पाटील यांनी आज पाडव्याच्या निमित्ताने शिर्डीत साईदर्शन घेतले, त्यानंतर जयंत पाटील (Jayant Patil) पत्रकारांशी बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भाजप-मनसे-शिंदे गट संभाव्य महायुतीवर (BJP-MNS-Shinde Group Alliance) जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, आपण एकमेकांना पुरणार नाही, इतके अपुरे असल्याचे भाजपला जाणवत आहे. त्यामुळे मिळेल त्यांना एकत्रित घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सर्व राजकारण्यांनी सुडाच राजकारण टाळले पाहिजे. व्यक्तिगत निंदा थांबवली पाहिजे. व्यक्तिगत द्वेष बुद्धीने बोलणे टाळले पाहिजे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत यापुर्वी असे नव्हते.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, सरकारने जनतेच्या हिताचे राज्य करावे आणि ते करतील अशी अपेक्षा आहे.
आम्ही विरोधी पक्षात असलो तरी जनतेचे हित महत्वाचे आहे. त्यामुळे या सरकारने जनतेच्या हिताची कामे करावी.
महाराष्ट्रात लाखो शेतकर्‍यांवर दिवाळी अगोदर मोठे संकट आले आहे. त्यातून पुन्हा उभे राहण्याची ताकद त्यांना राज्य सरकारने द्यावी.

Web Title :-  Jayant Patil | jayant patil reaction on bjp mns and shinde group alliance

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला उत्तर देणे फडणवीसांनी टाळले, एकाच वाक्यात म्हणाले – ‘ते उत्तर देण्यालायक…’

Stitch Scars Removing Tips | एलोवेरा आणि लिंबूच्या रसाने घालवा त्वचेवरील टाक्यांचे व्रण

Aaditya Thackeray | मला तर आता मळमळायला लागले आहे, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला टोला

Shambhuraj Desai | राष्ट्रवादी काँग्रेसचे सडेतोड प्रत्युत्तर, शंभूराज देसाईंचा विजय शिवतारे होईल

Related Posts