IMPIMP

Jayant Patil | अंबादास दानवेंच्या निवडीवरून राष्ट्रवादी नाराज

by nagesh
 Jayant Patil On Shivsena Dasara Melava | NCP leader jayant patil comment on shiv sena dussehra melava said no other party leaders invited

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन विधान परिषदेच्या (Legislative Council) विरोधी पक्षनेतेपदावर (Opposition Leader) महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Shiv Sena MLA Ambadas Danve) यांची शिफारस केली. यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे (Deputy Chairperson Neelam Gorhe) यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली. या निवडीवेळी महाविकास आघाडीला विचारात न घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच नव्या सरकारने विधिमंडळ अधिवेशनासाठी केवळ सहा दिवसांचा कालावधी ठेवला असून येवढ्यात हे अधिवेशन गुंडाळणं अयोग्य असल्याचंही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही नैसर्गिक आघाडी नाही. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही कायमची नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर काँग्रेस (Maharashtra Congress) स्वबळावर लढायला तयार आहे असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State President Nana Patole) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बोलण जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टाळलं असून अद्यापही महाविकास आघाडी अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितलं. शिवसेनेकडून अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेते पदावर निवड करण्यात आली असून त्यांनी या निवडीसंदर्भात मित्रपक्षांना विचारात घेतलं असतं तर बरं झालं असतं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

शिवसेना आमदारांना विधानसभा कामकाज सल्लागार समितीवर (Legislative Affairs Advisory Committee) घ्या अशी मागणी आम्ही केली असून यासंदर्भात मागणीचे पत्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी (Rainy Season) खूप कमी कालावधी आहे.
अधिवेशनात आम्ही राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करणार आहोत.
महागाई, पूर, शेतीचे प्रश्न असे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातले प्रश्न आम्ही या अधिवेशनात मांडणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
कारण राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नसून हे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही हे अधिवेशन लांबवण्याची मागणी केली होती असेही ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Jayant Patil | mlc opposition leader ambadas danve mva ncp jayant patil

हे देखील वाचा :

Aakash BYJU’S | आकाश बायजू’ज ने मुलींच्या समावेशकता आणि सक्षमीकरणासाठी ‘एज्युकेशन फॉर ऑल’ केले लॉच

Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही, काँग्रेसकडून आघाडी फुटण्याचे संकेत

Pune Crime | ‘मी गुन्हेगार आहे, मला पोलीस स्टेशनचा काही फरक पडत नाही’; जीवे मारण्याची धमकी देणार्‍या दोघा सावकारांना अटक

Related Posts