IMPIMP

Jayant Patil | टाटा एअरबस प्रकल्पावरुन जयंत पाटील संतापले, राज्य सरकारला केला सवाल, ‘अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?’

by nagesh
Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | ncp leader jayant patil slams shinde fadnavis goverment maharashtra over Maharashtra Karnataka Border Issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – Jayant Patil | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) गुजरातला पळवल्यानंतर भाजपाने (BJP) महाराष्ट्राला आणखी एक धक्का दिला आहे. आता तब्बल 22 हजार कोटी रूपयांचा टाटा एअरबस (Tata Airbus Project) हा हवाई दलासाठी विमाने बनवणारा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात (Shinde-Fadnavis Government) संताप व्यक्त होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना म्हटले की, गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्यांच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा सवाल पाटील यांनी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तळेगाव, पुणे येथे होणारा ‘वेदांता-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेल्याने उठलेला संताप शांत होत असतनाच आता नागपुरात येणारा ‘टाटा एअरबस’ प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट केले असून यात म्हटले आहे की, एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते. महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

भारतीय हवाई दलासाठी (Indian Air Force) सी-295 मालवाहू विमानांच्या निर्मितीसाठीचा 22 हजार कोटींचा
प्रकल्प गुजरातमधील बडोदा येथे उभारण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण सचिव अजयकुमार
(Defense Secretary Ajay Kumar) यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी
(PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गुजरात विधानसभा निवडणुकीची (Gujarat Assembly Elections) घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असल्याने भूमिपूजन सोहळा करण्यात येणार आहे.
त्यापूर्वी हा समारंभ होणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने ‘एअरबस’ कंपनीशी 21 हजार कोटींचा करार केला
होता. त्याअंतर्गत जुन्या अ‍ॅवरो-748 विमानांची जागा ‘सी-295’ ही अत्याधुनिक विमाने घेणार आहेत.
या विमानाच्या 96 टक्के भागांची निर्मिती भारतात होणार आहे.

Web Title :- Jayant Patil | ncp leader jayant patil criticized shinde fadanvis maharashtra government over tata airbus project moved to gujrat

हे देखील वाचा :

MNS | भाजप-मनसे-शिंदे युती होणार? भाजपचा मास्टर प्लॅन तयार

Abdul Sattar | टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याची आदित्य ठाकरेंची टीका झोंबल्याने मंत्री अब्दुल सत्तार त्यांना म्हणाले – ‘छोटा पप्पू…’

Abdul Sattar | दारु पिता का? या वादग्रस्त व्हिडिओवर अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण – म्हणाले…

Andheri Bypoll | शिवसेनेचे टेन्शन वाढले! ‘या’ उमेदवाराची अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची आयोगाकडे केली मागणी

Related Posts