IMPIMP

Jayant Patil | पोलीस दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, जयंत पाटील यांचा आरोप

by nagesh
Jayant Patil On President Rule In Maharashtra | If there is no mid-term elections in Maharashtra, there is a possibility of imposition of President's rule, claims Jayant Patil

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन जळगाव दूध संघात (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit, Jalgaon) पैशांचा अपहार आणि चोरी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्यांनी केला आहे. पक्षाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या प्रकरणात गुन्हा (FIR) दाखल करुन घेण्याची मागणी केली आहे. तरी देखील अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे पोलिसांवर दबाव आहे आणि ते दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, असा आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जळगाव दूध संघात अपहार नाहीतर चोरी झाली आहे. त्यामुळे तात्काळ गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तरी देखील पोलीस अधिक्षक गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरु राहणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या चोरीप्रकरणी कार्यकारी संचालकांनी तक्रार करुन चोवीस तास उलटूनही आरोपींवर गुन्हा दाखल करुन घेतला जात नाही, असे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

तसेच जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे (SP Pravin Munde) यांच्यावर प्रचंड दबाव आहे. गुन्हा दाखल करण्यात त्यांना भिती वाटत आहे. पोलीस स्वत:च्या कर्तव्यात कमी पडत आहेत, आपले कर्तव्य टाळत आहेत. त्यामुळे नव्याने आलेले सरकार कश्याप्रकारे कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) धाब्यावर बसवत आहेत, हे जळगाव चोरी प्रकरणातून दिसत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे गुरुवार (दि. 13) पासून जळगाव शहर पोलीस ठाण्याच्यासमोर
उपोषणाला बसले आहेत. जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जयंत पाटील गेले असता, त्यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी पाटलांनी पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे यांची देखील भेट घेतली.
यावेळी त्यांनी मुंडे राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल करुन घेत नसल्याचे पाटील यांनी माध्यमांना सागितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Jayant Patil | Police do not register cases under pressure, Jayant Patil alleges

हे देखील वाचा :

Sourav Ganguly ने बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्यानंतर विराटच्या चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

Sara Ali Khan – Shubman Gill | शुबमन गिल व सारा अली खानचा हॉटेलमधील ‘तो’ क्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल

CM Eknath Shinde | शिवसेनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का, जिल्हाप्रमूखाचा शिंदे गटात प्रवेश

Girish Mahajan | खडसेंना लाख वाटते, की त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, पण…, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसे यांना टोला

Related Posts