IMPIMP

Jayant Patil | राज्यात राजकीय संकट! जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य; म्हणाले…

by nagesh
Jayant Patil On President Rule In Maharashtra | If there is no mid-term elections in Maharashtra, there is a possibility of imposition of President's rule, claims Jayant Patil

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी सिल्वर ओक (Silver Oak) येथे महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या अध्यक्षेत पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादची पुढील दिशा ठरवण्यात आली. महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकावं अशी आमची इच्छा असल्याचेही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले. तसेच राज्यातील परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी आज (गुरुवार) सायंकाळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलवली असल्याची माहिती पाटील यांनी दिली. (Maharashtra Political Crisis)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार टिकावे, हीच आमची भूमिका आहे. या संकटात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांना शक्य ती सर्व मदत करु. राष्ट्रवादी सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल. ते पुढे म्हणाले, शरद पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि मी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी या संकटात आम्ही तुमच्यासोबत असल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी शेवटच्या क्षणापर्यंत हे सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करेल.

आमदार माघारी येतील
महाराष्ट्राच्या बाहेर असेलेले शिवसेना आमदार (Shivsena MLA) परत येतील आणि पुन्हा आपल्या पक्षात कार्यरत होतील, हा विश्वास आम्हाला आहे. ते परत आल्यावर चित्र स्पष्ट होईल. पण आमचा उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या सरकारला पूर्ण पाठिंबा असेल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

विरोधात बसण्याची तयारी
यावेळी जयंत पाटील यांनी वेळ पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसायला तयार असल्याचे संकेत दिले.
आम्ही आमच्या सर्व आमदारांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती देण्यासाठी मुंबईत बोलवले आहे.
सत्ता जाते म्हटल्यावर आमच्या आजुबाजूच्याही काही आमदारांच्या मनात दुसरीकडे जाण्याचे विचार येत आहेत.
त्यांनी आमच्याकडे तसं बोलून ही दाखवलं. मात्र आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की, या सगळ्यावर आपण विरोधी पक्षात बसायची तयारी करणे हाच एकमेव पर्याय आहे.
यावर पत्रकारांनी पाटील यांना तुम्ही विरोधी पक्षात बसायची तयारी केली आहे का, असा प्रश्न विचारला.
त्यावर जयंत पाटील यांनी म्हटले की, विरोधी पक्षात (Opposition) बसायची तयारी करावी लागत नाही.
परिस्थिती ती वेळ आणते, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Jayant Patil | we will support cm uddhav thackeray ncp will try till last moment to save mva govt says jayant patil

हे देखील वाचा :

Currency Printing Rate List | RTI मध्ये खुलासा, 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटांच्या छपाईचा रेट

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचं आणखी एक ट्विट जारी; म्हणाले – ‘ही आहे शिवसेना आमदारांची भावना’

Pune Crime | पालखीचे दर्शन घेत असताना तीन महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

Related Posts