IMPIMP

Jersey | शाहीद कपूरने शेअर केला जर्सी चित्रपटाचा नवीन पोस्टर, लिहिलं असं काही की…

by nagesh
Jersey | actor shahid kapoor shared the new poster of the film jersey on instagram

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन   Jersey | बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरने (Shahid Kapoor) त्याच्या आगामी ‘जर्सी’ (Jersey) चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केलं आहे. त्याने बुधवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर जर्शी चित्रपटाचे नवीन पोस्टर (Poster) चाहत्यांसाठी शेअर केले. त्या चित्रपटाची नवीन पोस्ट शेअर करताना शाहीद कपूरने त्याच्या कॅप्शनमध्ये जे लिहिलं आहे त्याचं खूप कौतुक होत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांचा ‘जर्सी’ (Jersey) हा चित्रपट याच डिसेंबर महिन्यात प्रकर्शित होत आहे. हा चित्रपट 31
डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होताच तो नेटफलिक्स (Netflix) वर देखील पाहता येईल. शाहिद कपूरने रिलीज
होणाऱ्या चित्रपटाचे नवीन पोस्टरमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. शाहिद कपूरचा चित्रपट जर्सी हा तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाचे तेलुगू
भाषेतील शीर्षक देखील जर्सी आहे.

जर्सी या चित्रपटात एका क्रिकेटपटूची कथा सांगितली जाईल. यामध्ये संबंधित क्रिकेटपटू वयाच्या तिसाव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतो. या
चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी (Gautam Tinnanuri) यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्यासोबत त्याचे वडिल दिग्दर्शक पंकज
कपूर (Pankaj Kapoor) ही दिसणार आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

‘जर्सी’ या चित्रपटापूर्वी शाहिद कपूरचा शेवटचा चित्रपट ‘कबीर सिंग’ (Kabir Singh) होता. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याच शाहिद कपूरच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. हा चित्रपट देखील ‘अर्जुन रेड्डी’ (Arjun Reddy) नावाच्या दक्षिण भारतीय चित्रपटाचा रिमेक होता . शाहिदचा आगामी चित्रपट ही साऊथचा रिमेक आहे. शाहिदने शेअर केलेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरला आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Web Title : Jersey | actor shahid kapoor shared the new poster of the film jersey on instagram

हे देखील वाचा :

Pune News | सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सतराव्या सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचे गुरुवारी उद्घाटन

Pune News | सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सतराव्या सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचे गुरुवारी उद्घाटन

Maharashtra Election Commission | ‘मतदार नाव नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ’

Kalicharan Maharaj | ‘कोरोनाच्या नावाखाली लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस’, कालीपूर कालीचरण महाराजांची मुक्ताफळे

Related Posts