IMPIMP

Jitendra Awhad | ‘सदाभाऊ खोत, तुमच्यात हिंमत असेल तर…’ केतकी चितळे प्रकरणी जितेंद्र आव्हाडांचं खुलं आव्हान

by Team Deccan Express
Jitendra Awhad | jitendra awhad slams sadabhau khot on ketaki chitale fb post sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट (Ketaki Chitale Offensive Facebook Post) फेसबुकवर शेअर केली होती. त्यानंतर केतकी विरोधात राज्यभरात 10 ठिकाणी राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. केतकीला अटक (Arrest) केली असून ठाणे क्राईम ब्रांचकडून (Thane Police Crime Branch) चौकशी सुरु आहे. दरम्यान, एककीकडे केतकीच्या पोस्टवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दुसरीकडे माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केतकीचे कौतुक करत तिला समर्थन दिले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सदाभाऊ खोत यांना खुलं आव्हान दिलं आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी घाटकोपर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

विकृत माणसांची सवय असते

सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळे प्रकरणानंतर तिचं कौतुक केल्यावरुन आव्हाडांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. केतकीनं पवारांविषयी लिहिलं म्हणून सदाभाऊ खोतांना राग येत नसेल कदाचित. 81 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या आजाराबद्दल बोलल्यानंतर, त्याच्या मरणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर सदाभाऊंना राग येत नसेल. विकृत माणसांची सवय असते ती, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

हिंमत असेल तर उत्तर द्यावं

आव्हाड पुढे म्हणाले, मला सदाभाऊ खोत यांना प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावं. तिनं जे बाबासाहेबांबद्दल लिहिलंय, तिनं जे महात्मा फुलेंबद्दल (Mahatma Phule) लिहिलंय, जे बौद्ध बांधवांबद्दल लिहिलंय त्याबाबत तिच्यावर अॅट्रॉसिटीचा (Atrocities) गुन्हा दाखल झालाय. यावरुन ती कणखरच मानाची आहे असं तुम्ही मानताय का? तिला माझं समर्थ आहे असं म्हणण्याची तुमच्यात हिंमत आहे का ? मग या शिवाजी पार्कवर (Shivaji Park) एकटे उभे राहून म्हणून दाखवा की माझं केतकीला समर्थन आहे. मी तिनं काय काय लिहिलंय याची आख्खी पोस्ट टाकणार आहे. तिची मानसिकता काय आहे, ती लिहिते कशी याकडे फक्त ती स्त्री आहे म्हणून दुर्लक्ष करुन चालणार नाही. प्रचंड आत्मप्रौढीपणा तिच्यात ठसठसून भरलाय, असं आव्हाड म्हणाले.

नाना पटोलेंवर साधला निषाणा

राष्ट्रवादीने भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद (Bhandara-Gondia Zilla Parishad)सभापती पदाच्या निवडणुकीत पाठीत
खंजीर खुपसल्याची टीका करत नाना पटोलेंनी (Nana Patole) थेट काँग्रेस (Congress) हायकमांडकडे यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला.
याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले कुठेही पोहचू द्या. महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) व्यवस्थित सुरु आहे.
राज्य सरकारमध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) असे अनेक मंत्री आहेत.
शेवटी एका घरात मोठा भाऊ-लहान भाऊ अशी भांडणं असतातच.
फक्त याबाबत बाहेर जाऊन बोलणं यात तुमची प्रगल्भता दिसते.
यातून तुमच्यातला अपरिपक्वपणा दिसतो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Web Title : Jitendra Awhad | jitendra awhad slams sadabhau khot on ketaki chitale fb post sharad pawar

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts