IMPIMP

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना कोर्टाचा दिलासा; ‘या’ खटल्यात जमीन मंजूर

by nagesh
Jitendra Awhad | ncp jitendra awhad gets bail thane court in molestation by bjp rida rashid

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाण्यातील एका पूल उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केले होते. या प्रकरणी त्या महिलेने आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता, याविरोधात जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) ठाणे कोर्टात धाव घेतली होती. आव्हाडांनी कोर्टात अटकपूर्व (Anticipatory Bail) जामिनासाठी अर्ज केला होता, त्यावर आज सुनावणी झाली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यामुळे खळबळ उडाली होती. पण, आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने आव्हाड यांच्यावरील जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. तो निकाल दुपारी 2 वाजता जाहीर करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. ठाणे कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन दिला गेला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता (Justice Prannoy Gupta) यांनी हा निर्णय दिला. ठाण्यामधील मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

गजानन चव्हाण (Gajanan Chavan) यांनी आव्हाडांच्या वतीने युक्तिवाद केला होता.
न्यायाधिशांना घडलेल्या प्रकाराची क्लिप दाखवली गेली होती. घटनास्थळी प्रचंड गर्दी होती,
असे सांगताना आव्हाड त्या महिलेला बहीण म्हणाले होते. अशी माहिती चव्हाणांनी कोर्टात दिली.
तसेच महिलेने याआधी दोन पुरुषांना धक्काबुक्की केली होती, असा दावा त्यांनी केला.
हा गुन्हा राजकीय हेतूने दाखल करण्यात आला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात त्यांनी केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Jitendra Awhad | ncp jitendra awhad gets bail thane court in molestation by bjp rida rashid

हे देखील वाचा :

IPS Saurabh Tripathi | निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींना न्यायालयाचा दिलासा, अंगडीया खंडणी प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

Bipasha Basu | बिपाशा बासूला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, मुलीसोबत दिली ही पोज ; फोटो सोशल मिडियावर व्हायरल

Pune Accident | पुण्यात दुर्दैवी घटना; ट्रॉलीच्या खाली येऊन गरोदर महिलेचा मृत्यू

Related Posts