IMPIMP

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा इशारा; म्हणाले – ‘शिवसेनेचा मोठा भाऊ म्हणून आदर करु, पण…’

by nagesh
Jitendra Awhad | ncp jitendra awhad shivsena navi mumbai thane mahavikas aghadi government eknath shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Jitendra Awhad | शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झालं. सध्या सरकारला दोन वर्ष पुर्ण होत आहे. तेव्हापासून आघाडीमध्ये अनेक कारणास्तव कुजबूज पाहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिवसेनेला (Shiv Sena) भर कार्यक्रमात इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘शिवसेना (Shiv Sena) मोठा भाऊ म्हणून जिल्ह्यात आदर करु, मात्र बोलायचं एक आणि करायचं एक हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा यावेळी आव्हाड यांनी दिला आहे. तर, ‘आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर टीका करायची, परंतु, तुम्ही मात्र पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणितं कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर जायचे याचे पर्याय खुले आहेत.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘निवडणुका आल्या की, सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी यासाठी मनपा अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशी वॉर्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता, असा आरोपही त्यांनी केला. असे मनमानी कृत्य करून वॉर्ड रचना पाडली जात असेल तर ही लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगानं लक्ष दिलं पाहिजे,’ अशी मागणी आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

दरम्यान, 2024 मध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होतील असं
शरद पवारांनी (Sharad Pawar) खासगीत सांगितलं असल्याचा खुलासा देखील केला.
परंतु आव्हाड यांनी यावेळी शिवसेना आणि अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

Web Title :- Jitendra Awhad | ncp jitendra awhad shivsena navi mumbai thane mahavikas aghadi government eknath shinde

हे देखील वाचा :

BMC Mayor Kishori Pednekar | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र; कुटुंबियांनाही गोळ्या घालून मारण्याची धमकी

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेची मोठी खेळी, मनसेला दिला झटका

Pune Crime | बनावट कागदपत्र्याद्वारे गाडी घेतल्याचे दाखवून पतसंस्थेची 12.75 लाखांची फसवणूक; दत्तवाडी पोलिस ठाण्यात FIR

Related Posts