IMPIMP

Jitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

by nagesh
Jitendra Awhad | ncp jitendra awhad slams mns raj thackeray on shivaji maharaj controversy

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Jitendra Awhad | राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. राज्यात सध्या जातीपातीचे राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याची सुरुवात केली होती, असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. जातीपातीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस करत नसून, राज ठाकरेच करत आहेत, असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. तसेच, ‘हर हर महादेव’ चित्रपटाला मनसेने पाठिंबा दिल्याच्या मुद्द्याचाही त्यांनी समाचार घेतला.

जात-पात आणि धर्म कोणत्या निकषांमध्ये मोजले जातात, हे मला कळत नाही. राष्ट्रवादीचा जन्म 1999 साली झाला. 2003 साली जेम्स लेन याने शिवाजी महाराजांच्या पितृत्वावर शंका उपस्थित केली. पण जेम्स लेनला ज्यांनी ही माहिती दिली होती ते लेले, मेहेंदळे, भंडारी यांची जाऊन तुम्ही माफी मागितली. त्यांनी आमच्या आईची चुकीची माहिती द्यायची, महाराजांची बदनामी करायची आणि तुम्ही त्यांची बाजू घ्यायची, यालाच जातपात म्हणतात. तेव्हा या लढाईत सगळ्यात आघाडीवर मी होतो. मी मराठा नाही, मागासवर्गीय आहे. मराठा हा शब्द महाराष्ट्राची ओळख आहे. तो आता जातीपातींमध्ये आला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी आम्ही बोललो, तेव्हा तुम्ही त्यांची बाजू घेतली. तेव्हा तुम्हाला जात-पात लक्षात आली नाही का, हर हर महादेव चित्रपटात शिवाजी महाराजांचे विकृतीकरण करण्यात आले, त्याला तुम्ही पाठिंबा दिला. बाजीप्रभू देशपांडे महाराजांच्या तुलनेचे होते आणि त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, असे चित्रपटात दाखविण्यात आले आहे, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यामुळे जातीपातींचे राजकारण वगैरे काही नसते. हे फक्त बोलण्यापुरते असते. ते करतात तेव्हा सर्व ठीक असते.
कारण ते महान आहेत. त्यांनी काहीही केलेले चालते. पण, आता काळ बदलला आहे.
सर्वकाही तुमच्या मनासारखे होईल, असे काही नाही. आता गोष्टी बदलल्या आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना सुनावले.

Web Title :- Jitendra Awhad | ncp jitendra awhad slams mns raj thackeray on shivaji maharaj controversy

हे देखील वाचा :

Pune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Pune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली

Raj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे

Related Posts