IMPIMP

Jitendra Awhad | ‘फ्लॅट रेंटनं देताना तसेच विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही’ – मंत्री जितेंद्र आव्हाड

by nagesh
Jitendra Awhad | a molestation case registered against jitendra awhad ncp mla upset with article 354 against him

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन Jitendra Awhad | घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची (Society NOC) काहीच
गरज नसल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. फ्लॅट रेंटनं देताना तसेच फ्लॅट विक्रीसाठी
सोसायटीची परवानगी लागत होती, दरम्यान आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार आता याची आवश्यकता लागणार नाही. (If the owner wants to
rent his flat or sell his flat he needs no NOC from the society – Dr. Jitendra Awhad)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, ”घर मालकाला स्वत:चा घराचा हक्क आहे की ते घर कोणाला विकावे, एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही. काही ठिकाणी जातीनिहाय घरे विकली जातात गुजराती गुजराती यांना जैन जैन यांना तर शाकाहारी शाकाहारी यांनाच विकतात. यामुळे महाराष्ट्र हा वेगवेगळ्या विभागांत विभागला जात आहे मुंबई ही एकत्र राहिले पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे.”

पुढे आव्हाड म्हणाले, ”एखाद्या घरमालकाने त्याची थकबाकी बाकी नाही, हे एनओसी पत्र काढून घ्यावे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तपास करतात,” असं देखील ते म्हणाले, तसेच, ”मुंब्रा – कळवा (Mumbra – Kalwa) येथे मोठ्या प्रमाणात खार जमीन आहे या जमिनीच्या संरक्षणासाठी वारंवार MIDC ला पत्र दिले व याचा पाठपुरावा केला. या जमिनीला संरक्षित करण्यासाठीही अनेक वेळा संबंधित खात्याला सांगितले आहे. पण, कोणाला त्याचं गांभीर्य नाही या जमिनीचा विकास करण्याचा दूरच राहिला या जमिनीवर निवडणुकीची कार्यालय आणि तलाठी यांची कार्यालय बांधण्याची इच्छा काही लोकांना आहे,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Web Title :- Jitendra Awhad | noc of society is not required for sale of flats big announcement of jitendra awhad

हे देखील वाचा :

Rubina Dilaik Saree Photo | रुबीना दिलैकनं साडीतील फोटोनं सोशल मीडियावर लागली आग.. पाहा व्हायरल फोटो

Esha Gupta Superhot Video | ईशा गुप्तानं पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपमधून सोशल मीडियावर केला कहर, व्हायरल व्हिडिओमध्ये डोळा मारून नेटकऱ्यांना केलं घायाळ..

ST Workers Strike | 5 महिन्यांच्या संपामुळे एसटी कर्मचारी कर्जबाजारी; 250 कोटींचे नुकसान

Related Posts