IMPIMP

Jitendra Awhad On ED | …तर मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही – जितेंद्र आव्हाड

by nagesh
Jitendra Awhad On ED | ncp leader and minister jitendra awhad shocking statement after ed action against shridhar patankar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Jitendra Awhad On ED | राज्यातील महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांच्या पाठीमागे
सक्तवसुली संचालनालयाचा (ED) ससेमिरा लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि
राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad On ED) अधिकच विषण्ण झाल्याचे दिसले. ‘ईडी आणि प्राप्तीकर विभागाकडून आतापर्यंत
महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी घ्यायचा तो निर्णय घेईल पण मला विचाराल तर आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही,’ असं खळबळजनक वक्तव्य जितेंद्र आव्हाड केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, ”राज्य सरकारकडून भाजप (BJP) नेत्यांची चौकशी सुरु असली तरी कोणालाही तुरुंगात टाकले आहे का ? चौकशी करणे आणि धाडी टाकणे यामध्ये फरक आहे. पण आता केंद्रीय यंत्रणा थेट घरात घुसल्या आहेत.
अर्थात यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते चर्चा करतील. पण मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही.” असं ते म्हणाले. (Jitendra Awhad On ED)

दरम्यान, मागील काही दिवसांपासून भाजपच्या काही नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड हेही तपास यंत्रणांच्या कचाट्यात असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभुमीवर त्यांनी असे भाष्य केले आहे का ? याबाबत राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर कारवाई..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या मालमत्तेवर मंगळवारी टाच आणली होती. यात ठाणे परिसरातील निलांबरी इमारतीमधील (Neelambari Building) 11 सदनिकांचा समावेश आहे.
या सदनिकांची बाजारभावानुसार किंमत साधारण 6.5 कोटी रुपये इतकी असल्याचे समजते.
‘ईडी’ने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर थेट कारवाई केल्याने आता भविष्यात तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील कितीही बडा नेता असला तरी कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत असा एक इशाराच यावेळी दिल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक बोलावली आहे.

Web Title :- Jitendra Awhad On ED | ncp leader and minister jitendra awhad shocking statement after ed action against shridhar patankar

हे देखील वाचा :

Crime News | दुर्देवी ! हैदराबादमध्ये भंगार गोदामाला लागलेल्या आगीत 11 मजुरांचा होरपळून मृत्यू

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे मनपाचे प्रशासक विक्रम कुमारांचा माजी नगरसेवकांना आणखी एक धक्का; म्हणाले – ‘आर्थिक वर्षाच्या शेवटी केलेल्या ‘विकास’ कामांची तपासणी केल्यानंतरच बिले देणार’

Pune Crime | पुणे लोहगाव विमानतळावर 48 लाख रुपयांचे 3 हजार हिरे जप्त

Related Posts