IMPIMP

Jitendra Awhad On President Rule | ‘राष्ट्रपती राजवट लावा…लै…’ ! जितेंद्र आव्हाडांनी रात्री एक वाजून एक मिनिटांनी केलेली पोस्ट चर्चेत

by nagesh
Maharashtra Politics | 10 lakh reward cutting jitendra awhad tongue bjp obc morcha leader kapil dahekar in jalna

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Jitendra Awhad On President Rule | मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानासमोर आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचं आंदोलन, त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवरील हल्ला तसेच मोहित कंबोज (BJP Leader Mohit Kamboj) यांच्या गाडीवरील हल्ला या सर्व घडामोडीमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप भाजपकडून (BJP) करण्यात येत आहे. दरम्यान, आमदार रवी राणा यांनी राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान (President, Vice President, Prime Minister) यांनी लक्ष घालावे असे म्हंटले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट (President’s Rule In Maharashtra) लागू होणार का? या चर्चेने जोर धरला आहे. (Jitendra Awhad On President Rule)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राष्ट्रपती राजवटीची जोरदार चर्चा सुरू असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रात्री १ वाजून एक मिनिटांनी केलेल्या ट्विटमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहेच पण सध्या या ट्विटवरच चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. काल रात्री एक वाजून एक मिनिटांन आव्हाड यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आलीय. “राष्ट्रपती राजवट लावा… लै मजा येईल” असं सहा शब्दांचं ट्विट त्यांनी केलं आहे. (Jitendra Awhad On President Rule)

आतापर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी भाजप आणि विरोधीपक्ष यांच्याकडून होत होती. मात्र आता राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत ट्विट केल्याने येत्या काही दिवसात राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भाजपची भूमिका काय?

दोन दिवसांपूर्वी पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची पत्रकार परिषद झाली होती. त्यामध्येही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी यासंदर्भात भाजपची असलेली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले की, महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi Government) इतकी भीती वाटत आहे की जरा काही झालं की त्यांना राष्ट्रपती राजवट आठवते. राष्ट्रपती राजवटीची मागणी आम्ही केली नाही. किंवा तसे पत्रही राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींना दिले नाही. राणा यांनाच नाही तर सर्वसामान्य माणूसही राष्ट्रपती राजवटीची मागणी करू शकतो. त्याला अधिकार आहेत असेही ते म्हणाले.

Web Title :- Jitendra Awhad On President Rule| Maharashtra Mahavikas Aghadi Thackeray Government Minister jitendra awhad tweet about president rule

हे देखील वाचा :

Pune Crime | भावंडांना खाऊसाठी पैसे देऊन घराबाहेर पाठवून 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Unhealthy Habits | निरोगी राहण्यासाठी चुकीच्या सवयी टाळा; नाहीतर आरोग्यावर होईल दुष्परिणाम, जाणून घ्या

Benefits Of Ghosali | घोसाळीची भाजी खाण्याचे एक नव्हे, अनेक आहेत फायदे, आजपासूनच करा डाएटमध्ये समावेश

Related Posts