IMPIMP

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या जामिनाचा निकाल राखीव; काय होणार याकडे सर्वांची उत्सुकता

by nagesh
 Jitendra Awhad | jitendra awhad reaction after prakash ambedkar statement on sharad pawar bjp

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाण्यातील एका पूल उद्घाटनाची कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केले होते. आता, या प्रकरणी त्या महिलेने आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याविरोधात जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) ठाणे कोर्टात (Thane Court) धाव घेतली. आव्हाडांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज सुनावणी झाली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते. पण, आज ठाणे कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने आव्हाड यांच्यावरील जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला असून दुपारी 2 वाजता निकाल जाहीर केला जाईल.

मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये (Mumbra Police Station) एसीपी सोनाली ढोले (ACP Sonali Dhole) यांनी विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
‘प्रकरण संवेदनशील आहे. हाताने बाजूला केले आहे.
आरोपी राजकीय बलाढ्य व्यक्ती आहे त्यामुळे अटक पूर्व जामीन दिल्यास गुन्ह्यावर परिणाम होईल.
त्यांना अटक पूर्व जामीन देऊ नये.’ अशी मागणी ढोले यांनी केली.
तर गजानन चव्हाण (Gajanan Chavan) यांनी आव्हाडांच्या वतीने युक्तिवाद केला.
न्यायाधिशांना घडलेल्या प्रकाराची क्लिप दाखवली गेली, असून आता न्यायालय (Thane Court) काय निर्णय देते यावर लक्ष लागले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Jitendra Awhad | the court will give its verdict on jeetendra awhads pre arrest bail at 2 pm

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | इथेही महाराष्ट्र एक नंबर; आजी माजी आमदार आणि खासदारांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा अहवाल

Pune Crime | बोपदेव घाट परिसरात लुटमार करणारा सराईत गुन्हेगार स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 85 जणांवर कारवाई

Alia Bhatt | आलियाने शेअर केला मुलीच्या जन्मानंतरचा पहिला फोटो, पण लोकांनी केली ‘ही’ मागणी

Related Posts