IMPIMP

Joe Root | चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अनोखी शक्कल; Video व्हायरल

by nagesh
Joe Root | joe root used jack leachs head in a brilliant idea to shine the ball pak vs eng test

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Joe Root | सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी या ठिकाणी खेळवला जात आहे. हा सामना अनिर्णित होण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. कारण इंग्लंडच्या पहिल्या डावातील 657 धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननेदेखील चांगली सुरुवात केली आहे. पाकिस्तानने पहिल्या विकेटसाठी 225 धावांची भागीदारी केली आहे. पाकिस्तानची विकेट मिळत नसल्याने इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटने सामन्याच्या दरम्यान चेंडू चमकवण्यासाठी एक अजब शक्कल लढवली. त्याच्या या कारनाम्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Joe Root)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय आहे व्हिडिओमध्ये?
आयसीसीने चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घातली आहे. अशा स्थितीत क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज चेंडूला चमकवण्यासाठी काही ना काही मार्ग शोधत असतात. यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने चेंडूला चमकवण्यासाठी अनोखी पद्धत वापरली आहे. जो रुट पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी जॅक लीचच्या डोक्यावर चेंडू घासून चमकवताना दिसला. (Joe Root)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

लीचच्या डोक्याच्या प्रत्येक भागावर चेंडू घासून रुट घामाने चेंडू चमकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
त्याची ही शक्कल बघून चाहत्यांपासून ते समालोचकांपर्यंत सगळ्यांना हसू फुटले आहे.
चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

Web Title :- Joe Root | joe root used jack leachs head in a brilliant idea to shine the ball pak vs eng test

हे देखील वाचा :

Kolhapur Crime | चुलतीवर बलात्कारप्रकरणी पुतण्याला 10 वर्षांची सक्तमजुरी, कोल्हापूरमधील घटना

Chatrapati Shivaji Maharaj | भाजपचे ढोंगी शिवरायप्रेम; भाजप किती तोंडी नाग? सामना अग्रलेखातून टीकेचा भडीमार

Pune Crime | मित्र-मैत्रिणींनी चोरीचा आळ घेत तरुणीचे काढले कपडे; पुण्यातील नावाजलेल्या कॉलेजची घटना, 3 तरुणींसह 5 जणांवर FIR

Related Posts