IMPIMP

Karuna Munde | ‘मला अजूनही न्याय मिळाला नाही. पण मी समाधानी’ ! करूणा मुंडे म्हणाल्या – ‘धनंजय मुंडे स्वत:हून मला…’

by nagesh
Karuna Sharma Allegations Against Dhananjay Munde | karuna sharma once again serious allegations against former minister dhananjay munde what she said

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनमला अजूनही न्याय (Justice) मिळाला नाही. पण मी समाधानी आहे. माझे पती जेव्हा स्वत:हून माझ्याजवळ आणि
मिडियासमोर (Media) येतील आणि ‘पम्मी तुम जिती मै हारा’ असं जेव्हा म्हणतील, शपथविधीमध्ये जेव्हा ते माझं नाव घेतील तेव्हाच मला न्याय मिळाला
असे समजेन, असे करुणा धनंजय मुंडे (Karuna Munde) यांनी सांगितले. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करुणा मुंडे
(Karuna Munde) बोलत होत्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी आज पुण्यात (Pune) एका कामगार संघटनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. काही दिवसांपूर्वी
त्यांनी एका राजकीय पक्षाची (Political Party) स्थापना केली. त्यानंतर राज्यभरात पक्षाचा विस्तार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,
माझ्या पक्षाचा नारा वेगळा आहे. कार्यकर्ता समोर असेल आणि त्याच्या पाठीमागे करुणा मुंडे असतील. निवडणूक (Election) लढवण्याची वेळ आली
तर आधी कार्यकर्त्यांना उमेदवारी देईन. माझ्यावर निवडणूक लढवण्याची वेळ आलीच तर परळीमधून (Parli) निवडणूक लढवेल. ही निवडणूक नवरा विरुद्ध बायको (Husband vs Wife) अशी लढत असेल, असेही करुणा मुंडे यांनी सांगितले.

म्हणून मी भाजप मधून बाहेर पडले, पण आता…

1998 पासून मी भारतीय जनता पक्षात (BJP) होते. पाच महिने पक्षाचं काम केलं. मी बाहेर जाणं माझ्या नवऱ्याला आवडत नसल्यामुळे मी पक्ष सोडून दिला आणि घरात बसले. परंतु आता मी पुन्हा राजकारणात आले आहे, असे करुणा मुंडे यांनी सांगितले.

मी स्वत:न्याय मिळवून घेतला

धनंजय मुंडेंना मी जेव्हा पहिल्यांदा भेटले त्यावेळी मी 16 वर्षाची होते. ही जास्त काही बोलणार नाही असं म्हणून त्यांनी मला या प्रकरणात ढकललं. ही कुणाला काही बोलणार नाही, काही दिवस फडफडेल आणि घरात शांत बसून राहील असं त्यांना वाटलं असावं. मात्र देवाला काही वेगळेच मंजूर होते. मी आता माझ्या स्वत:च्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर माझ धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी बोलणं झालं. मी खूप चांगलं काम करते असं देखील त्यांनी मला सांगितले. मला त्यांच्याकडून आतापर्यंत न्याय मिळाला नाही, मी स्वत:न्याय मिळवून घेतल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title Karuna Munde | when dhananjay munde himself will say me i quit then i will get justice karuna munde says in pune

हे देखील वाचा :

Coronavirus | कोरोना विषाणूवरील प्रभावी 2 नव्या औषधांच्या वापराला WHO ची मंजूरी

Sugar Patients Diet | ’शुगर फ्री’ आहेत ‘ही’ 5 फळे आणि भाज्या, तज्ज्ञांनी डायबिटीज रूग्णांना दिला खाण्याचा सल्ला

What To Do In Home Isolation | होम आयसोलेशनमध्ये उपचार करत आहात का ? कधीही करू नका ‘या’ चूका

Related Posts