IMPIMP

Karuna Munde | करुणा मुंडेंचा नवा गौप्यस्फोट, म्हणाल्या – ‘राज्यातील 2 मंत्र्यांच्या बायका आमच्या पक्षात येणार’

by nagesh
Karuna Sharma | a case has been registered against karuna sharma on the complaint of an activist of dhananjay munde in parli

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइनसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी नवा पक्ष (New Party) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, पक्ष स्थापना कोरोनामुळे (Corona) लांबणीवर पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. परंतु त्यांनी आज नगरमध्ये (Ahmednagar) कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद घेऊन आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) दोन मंत्र्यांच्या बायकाही (Two Ministers Wife) माझ्याप्रमाणेच त्रस्त आहेत. त्यामुळे त्याही लवकरच आपल्यासोबत येणार (Join) आहेत, असे करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी सांगितले. मात्र, त्या मंत्र्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार पण एक मंत्री राष्ट्रवादीचा (NCP) तर दुसरा शिवसेनेचा (Shivsena) असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी ‘शिवशक्ती सेना’ (Shiv Shakti Sena) या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. नगरमध्ये 30 जानेवारी रोजी मेळावा घेऊन पक्षाची स्थापना करणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते. परंतु कोरोनामुळे ते लांबणीवर पडले आहे. करुणा मुंडे आज (मंगळवार) नगरला आल्या होत्या. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, माझ्यावर जी परिस्थिती आली, ती अनेक मंत्र्यांच्या कुटुंबातही आलेली आहे. राज्यातील विद्यमान दोन मंत्र्यांच्या पत्नी आपल्या संपर्कात आहेत. त्याही आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांनी नावे आताच जाहीर केली जाणार नाहीत. नगरमध्ये पक्षाची स्थापना केली जाईल, तेंव्हा सर्व स्पष्ट होईल.

धनंजय मुंडेंकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न
आपल्या तसेच मंत्र्यांच्या पत्नीच्या राहणीमानावर मुंडे पुढे म्हणाल्या, मी राजकारणात (Politics) येऊ नये म्हणून माझे पती धनंजय मुंडे यांनी माझ्यावर दबाव (Pressure) टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु एकादा राजकारणात आल्यावर मागे वळायचे नाही, असे मी ठरवले आहे. मी एकदम साधी राहणारी आहे. मंत्र्यांच्या बायका गाडीतून फिरतात. 25 हजारांच्या साड्या परिधान करतात. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीच्या कपाटात तीन कोटींच्या साड्या आहेत. मात्र, माझ्याकडे पाच लाखांच्या देखील साड्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यपालांची भेट घेणार
राज्यातील प्रश्नासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, राज्यात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
त्यासाठी आपण लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहे.
राज्यातील अनेक कामे प्रलंबित असताना दुसरीकडे सरकारने मंत्र्यांची दालने आणि आमदार निवास यावर कोट्यावधी रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे.
ते काम तातडीने बंद करण्याची मागणी करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

सभा रोखण्याचा प्रयत्न केला
आमच्या पक्षाच्यावतीने राज्यभर दौरा सुरु केलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असता माझे पती धनंजय मुंडे
यांच्या कार्यकर्त्यांनी माझी सभा रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, न डगमगता माझे कार्य पुढे सुरु ठेवणार आहे.
आमच्या पक्षात अनेक संघटना तसेच इतर पक्षाचे लोकही प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आमची चर्चा सुरु आहे.
कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली जाणार असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Karuna Munde | wife of two ministers to join my party says karuna sharma munde

हे देखील वाचा :

TATA AIA Life Insurance | ‘या’ प्लानमध्ये ABD, HCB पासून प्रीमियमच्या 105% रिटर्न मिळवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर

OTT Release This Week | हा आठवडा असेल कॉमेडी, ड्रामा, सस्पेन्स आणि रोमान्सने परिपूर्ण ! ‘हे’ चित्रपट आणि मालिका होणार प्रदर्शित

Pune Crime | NDPS गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

PMSYM | सरकारकडून दरमहिना रू. 3000 मिळवण्यासाठी इथं 46 लाखापेक्षा जास्त लोकांनी केले रजिस्ट्रेशन, जाणून घ्या काय आहे योजना आणि कसा करावा अर्ज?

Related Posts