IMPIMP

Keshav Upadhye | आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा!, आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान

by nagesh
Keshav Upadhye | Show the project site first, then protest!, BJP's challenge to Aditya Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Keshav Upadhye | घराण्याच्या वारशातून शिवसेनेचे (Shivsena) नेतेपदाची माळ गळ्यात पडलेले आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्प विषयीच्या (Vedanta Foxconn project) आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते स्वतःच उघडे करणार आहेत. या प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारने (Thackeray Government) अडीच वर्षात काहीही प्रयत्न केले नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे स्वतःच येत्या शनिवारी तळेगावजवळ आयोजित केलेल्या आंदोलनातून देणार असल्याने त्यांच्या आंदोलनाची महाराष्ट्र वाटच पाहत आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते (State BJP Spokesperson) केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मतदारांचा कौल खुंटीवर टांगून फसवणुकीने मिळविलेली सत्ता आणि प्रकल्पाच्या वाटाघाटींचा वाटा या दोन्ही बाबी हातून गेल्याने ठाकरे पितापुत्रांनी नैराश्याने ग्रासले आहे. तळेगावजवळ (Talegaon) जेथे हा प्रकल्प येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे, त्याबाबत साधा सामंजस्य करारदेखील ठाकरे सरकारने केलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता आदित्य ठाकरे या प्रकल्पाच्या नियोजित स्थळी आंदोलन करणार असल्याच्या वावड्या शिवसेनेकडून उठविल्या जात आहेत. त्यामुळे, आधी या प्रकल्पासाठी राखून ठेवलेली जागा दाखवा आणि मगच आंदोलन (Agitation) करा, असे आव्हानही उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी दिले.

तळेगावातील भूसंपादन फॉक्सकॉनच्या नियोजित प्रकल्पासाठी नव्हे, तर एमआयडीसीच्या (MIDC) नियोजित टप्पा-४ प्रकल्पासाठी करण्यात आले होते. ही जमीन फॉक्सकॉन प्रकल्पासाठी असल्याचे संबंधित जमीन मालकांनाही माहीत नाही, त्यामुळे प्रकल्पाची नियोजित जागा व त्यासंबंधीच्या अधिकृत सरकारी नोंदी अगोदर ठाकरे यांनी दाखवाव्यात, असेही उपाध्ये म्हणाले. ठाकरे पितापुत्रांना महाराष्ट्राची माहिती नाही. वडिलोपार्जित नेतृत्वाच्या वारशातून राज्यावर हक्क सांगणाऱ्या ठाकरे कुटुंबाने (Thackeray Family) आपल्या सत्ताकाळात फॉक्सकॉन प्रकल्पासाठी नेमकी जागा अधिसूचित केली असती, तरी या प्रकल्पासाठी काही केल्याचे श्रेय त्यांना मिळाले असते. पण वाटाघाटींच्या नावाखाली वेगळ्याच हालचालींचा सुगावा लागल्यामुळेच फॉक्सकॉनने महाराष्ट्रातून काढता पाय घेतला असा आरोपही उपाध्ये यांनी केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आदित्य ठाकरेंना पाच प्रश्न

फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगावजवळ नियोजित होती, असे आदित्य ठाकरे वारंवार सांगत आहेत.
त्यामुळे, तळेगावातील कोणती जागा या प्रकल्पासाठी ठाकरे सरकारने देऊ केली होती,
त्यासंबंधी विशिष्ट जागेच्या महसुली नोंदी केल्या गेल्या होत्या का?,
या प्रकल्पासाठी ठाकरे सरकारने किती वेळा अधिकृत बैठका घेतल्या?,
त्यामध्ये कोणत्या वाटाघाटी झाल्या?, ठाकरे सरकारने या प्रकल्पासाठी वेदांता-फॉक्सकॉनला कोणत्या सवलती
दिल्या?, या प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी आंदोलनाआधी महाराष्ट्राला द्यावीत, असेही उपाध्ये म्हणाले.
ज्या ठिकाणी ते आंदोलन करणार आहेत, त्या जागेवर नियोजित प्रकल्पाची नोंद आहे ना याची अगोदर खात्री करून
घ्यावी, अन्यथा भलत्याच ठिकाणी आंदोलन करून महाराष्ट्राची फसवणूक करण्याचा प्रयत्नच फसेल व पुन्हा पितळ उघडे पडेल असा टोलाही त्यांनी मारला.

Web Title :-  Keshav Upadhye | Show the project site first, then protest!, BJP’s challenge to Aditya Thackeray

हे देखील वाचा :

Pune Crime | चित्रपट निर्मितीसाठी पुण्यात सुरु केली वित्तिय संस्था, कर्ज मंजुरीच्या आमिषाने 100 ते 150 जणांना फसवणारी बंटी-बबलीची जोडी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

Pune Crime | रस्त्यावर पडलेल्या केबलमुळे दुचाकीस्वार महिला पोलीस गंभीर जखमी, केबल टाकणाऱ्यांच्या विरोधात FIR

Amitabh Bachchan On BMC | कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कामाचे ‘बिग बी’नी केले कौतुक

Related Posts