IMPIMP

Ketki Chitale | केतकी चितळेच्या अडचणीत वाढ ! ‘तुका म्हणे’ या शब्दावर देहू संस्थानचा आक्षेप

by Team Deccan Express
Ketki Chitale | satirical writing using the word tuka mhane increased difficulty of marathi actress ketaki chitale

देहूगाव : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह (Offensive) भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिला अटक (Arrest) करण्यात आली असून न्यायालयाने तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. त्यानंतर आता केतकी चितळेच्या (Ketki Chitale) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संत तुकाराम महाराजांची (Saint Tukaram Maharaj) ‘तुका म्हणे’ ही स्वाक्षरी (Signature) असल्याने पोस्टमध्ये तीचा वापर केल्याने केतकीवर गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी देहू संस्थानने (Dehu Sansthan) केली आहे.

याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे (Nitin Maharaj More), विश्वस्त अजित महाराज मोरे (Trustee Ajit Maharaj More), दिलीप गोसावी (Dilip Gosavi), उमेश मोरे (Umesh More) इत्यादी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, श्री संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची ‘नाममुद्रा’ असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे. (Ketki Chitale)

वारकरी संप्रदाय हा स्त्रियांचा सन्मानच करतो. परंतु अशा प्रकारे राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठी कोणत्याही संताचा अथवा त्यांच्या साहित्याचा आधार घेऊ नये. कोणीही संतांचे विडंबन करु नये. माणसाने माणसासारखे वागावे, अशा टीका करणाऱ्यांनी वारकरी संप्रदायाचा अंत पाहू नये, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केले आहे.

श्री संत तुकाराम महाराजांनी वाईट प्रथा, चालीरीती, अंधश्रद्धा यांवर अभंगाच्या माध्यमातून अपप्रवृत्तीवर आघात केला आहे.
परंतु, असे करताना त्यांनी प्रमाणही दिले आहे.
राजकीय टीका करण्याबाबत काही म्हणणे नाही, मात्र संतांच्या नावांचा आधार घेऊन अशी टीका करु नये.
शासनाने या प्रवृत्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Web Title :- Ketki Chitale | satirical writing using the word tuka mhane increased difficulty of marathi actress ketaki chitale

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts