IMPIMP

खेड पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापतीकडून सहकार्‍यांवर जीवघेणा हल्ला, हवेत गोळीबार?

by bali123
khed panchayat samitis shivsena sabhapati bhagvan pokhatkar attacks colleagues

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे जिल्ह्यातील खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर bhagvan pokhatkar यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला व पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर यावेळी पिस्तूलाचा धाक देखील दाखवण्यात आला आहे.

तुम्ही सुद्धा आहात PhonePe यूजर तर घरबसल्या घेऊ शकता ICICI Pru चा टर्म इन्श्युरन्स, कुटुंबाला मिळेल 25 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा

याप्रकरणी प्रसाद काळे (वय 28) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार हवेली पोलीस ठाण्यात सभापती भगवान नारायण पोखरकर bhagvan pokhatkar, जालिंदर पोखरकर आणि अनोळखी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाईल्डरनेस्ट या पंचतारांकित हॉटेलात हा प्रकार घडला आहे. खडकवासला येथे हे हॉटेल असून, घटना आज पहाटे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान पोखरकर bhagvan pokhatkar आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. या हल्ल्यात दोनजन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कर्जत-जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार; मिरजगाव व खर्डा येथे वखार उभारणीस मान्यता, आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

पंचायत समितीसभापतीपदाच्या निवडणूकीवरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भगवान पोखरकर bhagvan pokhatkar यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्या नंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते म्हणून समितीच्या सदस्य असलेल्या सविता सांडभोर यांनी इतर सहा सदस्यांसोबत मिळून पोखरकर विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्या ठरावाच्या बाजूने येत्या 31 तारखेला मतदान होणार होतं त्यामुळे ठराव मांडणारे सर्व सदस्य या हॉटेलात थांबलो होते. मात्र ही माहिती पोखरकर यांना मिळाली आणि त्यांनी रात्री आपला भाऊ आणि कार्यकर्त्यासोबत येऊन आमच्यावर बंदूक, कोयता आणि लोखंडी गजानी जीवघेणा हल्ला केला.

Also Read :

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

Related Posts