IMPIMP

Kiran Mane | प्रसिद्ध अभिनेता किरण माने आता शरद पवार यांची भेट घेणार

by nagesh
Kiran Mane | Marathi actor kiran mane will meet ncp chief sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kiran Mane | मराठी प्रसिद्ध अभिनेता किरण माने (Kiran Mane) याना स्टार प्रवाह वरील ”मुलगी झाली हो” या
मालिकेतून काढुन टाकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राजकीय विषयांवर भाष्य केल्यामुळेच मला काढून टाकण्यात आले असा
आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर आज (शनिवारी) किरण माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची
भेट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला अधिक उत येण्याची शक्यता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

किरण माने (Kiran Mane) आज मुंबईतील सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटणार असल्याचे कळते. त्याचबरोबर
मालिकेच्या निर्मात्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देखील दिलं आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेचे निर्माते म्हणाले, ‘किरण माने यांना राजकीय भूमिका
घेतल्यामुळे काढण्यात आलेले नाही, तर काही व्यवसायिक कारणांमुळे त्यांना काढल्याचं निर्मात्यांनी सांगितलं, पण एक मुलाखतीमध्ये माने यांनी
याबाबत खुलासा करत राजकीय घटनांवर भूमिका मांडल्यामुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं.

दरम्यान, किरण माने यांनी (गुरुवारी) 13 जानेवारी रोजी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा, गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!, असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. दरम्यान, आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिले आहेत. तसेच “होय, मला मालिकेतून काढून टाकले आहे. असं