IMPIMP

Kirit Somaiya | अजित पवारांनी ‘जरांडेश्वर’च्या मालकाचे नाव घोषित करावे, किरट सोमय्यांनी केला ‘हा’ गंभीर आरोप

by nagesh
Kirit Somaiya | ncp leader ajit pawars son law mohan patils crore financial transactions allegation kirit somaiya

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज (बुधवार) बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी परिवहन अधिकारी (Transport Officer) बजरंग खरमाटे (RTO Bajrang Kharmate) यांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेत पवार परिवारावर (Pawar family) गंभीर आरोप केले आहेत. हनुमानाच्या शेपटी प्रमाणे जरांडेश्वरच्या (jarandeshwar sugar factory) मालकाची यादीच वाढत आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) या कारखान्याच्या मालकाचे नाव घोषित करावे. चालक कोण आहे हे जगाला माहिती आहे. पवार परिवाराने बेनामी कारखाने पदाचा गैरवापर करुन घेतल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

बारामती येथील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, जरांडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. कंपनी कोणाची, अजित पवारांनी मालकाचे नाव घोषीत करावे. हा कारखाना विकत घेण्यासाठी त्यांनी बेनामी पद्धत का वापरली, गुरु कोमोडिटी सर्व्हीसेस प्रा. लि. (Guru Commodity Services Pvt. Ltd.) ला अजित पवार यांनी साखर कारखाना घेण्यासाठी 65 कोटी रुपये मागील दाराने दिल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला.

पवार परिवाराने जाब द्यावा
सोमय्या पुढे म्हणाले, या सगळ्या बाबींचा तपास झाला पाहिजे. तसेच या सगळ्याचा जाब पवार परिवाराने द्यावा. ठाकरे सरकारचे (Thackeray government) 40 घोटाळे समोर आले आहेत. आतापर्यंत 26 घोटाळ्यांची तक्रार आपण केल आहे. यामध्ये राजकीय पदाधिकारी आणि 4 अधिकाऱ्यांसह 16 जणांच्या तक्रारींचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मारहाण करण्याचा प्रयत्न

जरांडेश्वर कारखान्याला भेट देताना गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न झाला.
अजित पवार यांच्या लोकांनी गुंडागर्दी करत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी सोमय्या यांनी केला आहे.
हा प्रकार झेड सिक्युरिटी (Z Security) आणि पोलीस प्रशासनाने ‘नोट’ केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title :- Kirit Somaiya | Ajit Pawar should announce the name of the owner of ‘Jarandeshwar’, Kirat Somaiya made ‘this’ serious allegation

हे देखील वाचा :

Svamitva Scheme | PM मोदींकडून 1.71 लाख लाभार्थ्यांना ई-प्रॉपर्टी कार्डचं वाटप, पंतप्रधान म्हणाले – ‘आता सरकारकडे गरीबांनी फेर्‍या मारण्याचे युग संपले’

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 117 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | ॲमेझॉन घोटाळ्यात साडेआठ हजार कोटीचा ‘भ्रष्टाचार’ ! भाजपचा पर्दाफाश करा; काँग्रेसजनांनो एकदिलाने महापालिका निवडणूक लढवा – काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (Video)

Related Posts