IMPIMP

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘तो’ फोटो केला ट्विट, राज्याच्या राजकारणात खळबळ

by nagesh
Kirit Somaiya | BJP leader kirit somaiya tweeted shridhar patankar case money laundering fame chandrakant patel of pushpak group with uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) हे ईडीच्या (ED) रडावर असून कालच ‘पुष्पक ग्रुप’ (Pushpak Group) ची ठाण्यातील 6.45 कोटी रुपयांची एक मालमत्ता ईडीने जप्त केली. श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणामध्ये एक नाव समोर आलं होतं ते म्हणजे पुष्पक ग्रपचं. हा पुष्पक ग्रुप महेश पटेल (Mahesh Patel), चंद्रकांत पटेल (Chandrakant Patel) आणि कुटुंबीयांच्या मालकीचा आहे. त्यापैकी एक असलेल्या चंद्रकांत पटेल यांच्यासोबतचा उद्धव ठाकरेंचा एक फोटो भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) ट्विट केला आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणात चंद्रकांत पटेल यांचे नाव समोर आलं होतं. आता याच चंद्रकांत पटेल यांच्या सोबतचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट केला आहे. हा फोटो कधीचा आहे हे समजू शकले नाही आणि त्याची सत्यता आम्ही पडताळून पाहिलेली नाही. परंतु श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणात ज्यांचे नाव आले ते चंद्रकांत पटेल आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो किरीट सोमय्या यांनी ट्विट केला आहे.

किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे की, चंद्रकांत पटेल आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत. पटेल हे सीए (CA) असल्याचे सांगितले जात आहे. काही राजकीय नेत्यांचे आर्थिक व्यवहार (Financial Transaction) ही पटेल सांभाळत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पटेल एकत्र असल्याचा फोटो सोमय्या यांनी ट्विट केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी फोटो ट्विट केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय (CMO Maharashtra) किंवा शिवसेनेकडून (Shivsena) अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर असून यावरुन आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
मेसर्स पुष्पक बुलियन (Pushpak Bullion) ही पुष्पक ग्रुपची एक कंपनी आहे. पुष्पक ग्रुप हा महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि कुटुंबीयांच्या मालकीचा आहे.
या कंपनीची 6 कोटी 45 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
जप्त केलेल्या मालमत्तेत निलंबरी प्रोजेक्टमधल्या (Nilambari Project) 11 फ्लॅट्सचा समावेश आहे.
निलांबरी प्रोजेक्ट हा साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड (Saibaba Housing Pvt. Ltd.) या कंपनीचा आहे.
साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची आहे.
पुष्पक ग्रुपचे नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishore Chaturvedi) यांच्या शेल कंपनीच्या (Shell Company) माध्यमातून पैसा पाटणकरांच्या कंपनीला दिला.
मेसर्स हमसफर डिलर प्रायव्हेट लि. (Humsafar Dealers Pvt Ltd.) या कंपनीच्या माध्यमातून पैसे दिले.
विनातारण 30 कोटी रुपये कर्ज दिल्याचा आरोप करण्यात अल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Web Title :- Kirit Somaiya | BJP leader kirit somaiya tweeted shridhar patankar case money laundering fame chandrakant patel of pushpak group with uddhav thackeray

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून ज्येष्ठ मंत्र्यांचा काढता पाय; मुख्यमंत्री ठाकरेंची मार्मिक शब्दात टिप्पणी

Supreme Court Order To Modi Government | ‘कोरोना’ मृतांच्या कुटुंबियांना 60 दिवसांत मदत द्या, सर्वोच्च न्यायालयाचे मोदी सरकारला आदेश

Shivsena MP Shrirang Barne | ‘राजेश टोपेंची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार’; शिवसेना खासदाराचं वक्तव्य

Related Posts