IMPIMP

Kolhapur Crime | कोल्हापुरात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या गावगुंडांना खाकी वर्दीचा दणका

by nagesh
Kolhapur Crime | kolhapur police action on drinking alcohol

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दहा ते पंधरा गावगुंडांना कोल्हापूर (Kolhapur Crime) पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. गेले काही दिवस कोल्हापुरात दारू पिऊन धिंगाणा घालत दहशत पसरवणाऱ्या गावगुंडांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलीस झोपली की काय असा प्रश्न नागरिक विचारू लागले होते. मात्र, अशा धिंगाणा घालणाऱ्या गावगुंडांवर कोल्हापूर (Kolhapur Crime) पोलिसांनी कारवाई केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोल्हापूर शहरातील व्हिनस कॉर्नर येथे दारू पिऊन दहशत निर्माण करणाऱ्या गावगुंडांना मंगळवारी रात्री पोलिसांनी खाकी वर्दीचा दणका दाखवला आहे. गेले अनेक दिवस दररोज काही तरुण व्हिनस कॉर्नर परिसरामध्ये दारू पिऊन धिंगाणा करत असल्याची तक्रार काही नागरिकांनी शाहूपुरी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून चोप दिला आहे. ही घटना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

कोल्हापुरात दारू पिऊन धिंगाणा घालने, खून करणे, चोऱ्या हाणामारीच्या घटनेत वाढ झाली होती.
त्यामुळे दहशतीचे प्रमाणही वाढले आहे. त्यात आता पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा घटनांना आळा बसेल,
अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title :- Kolhapur Crime | kolhapur police action on drinking alcohol

हे देखील वाचा :

Gujarat Election 2022 | नवसारी येथे भाजप उमेदवार पीयूष पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला

Pune Traffic Police – PMC Water Supply | ‘जड वाहतूक’ या शिर्षकाखाली वाहतूक पोलिसांची ‘पाण्याच्या टँकर्स’वर कारवाई ! पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने उपनगरातील नागरिकांकडून संताप व्यक्त
Jalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय

Related Posts