IMPIMP

Kolhapur Wrestler Died | धक्कादायक! कोल्हापुरमध्ये पैलवानाचा सरावादरम्यान मृत्यू

by nagesh
Kolhapur Wrestler Died | kolhapur wrestler died only 23 year old wrestler dies during practice in kolhapur

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन कोल्हापूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका पैलवानाचा सरावादरम्यान मृत्यू (Kolhapur Wrestler Died) झाला आहे. तो अवघ्या 23 वर्षांचा होता. मारुती सुरवसे (Maruti Survase) असे त्या मृत पैलवानाचे नाव आहे. तो मूळचा पंढरपूर जवळ असलेल्या वाखरी या ठिकाणी राहणारा होता. हार्ट अटॅकमुळे (Heart Attack) या पैलवानाचा मृत्यू (Kolhapur Wrestler Died) झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय घडले नेमके?

मृत मारुती सुरवसे हा गेल्या काही वर्षांपासून कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. नेहमीप्रमाणे काल रात्री तालमीत कुस्तीचा सराव करून घरी येऊन अंघोळ करत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याच्या मित्राने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

 

मारुतीचे वडील हे वाखरीत शेती करतात. मारूतीला लहानपणा पासूनच कुस्तीची (Kushti) आवड असल्यामुळे कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी त्याला कोल्हापूर येथील तालमीत कुस्तीच्या सरावासाठी पाठवण्यात आले होते.
आपल्या तरुण पोराच्या अशा अचानक जाण्याने सुरवसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मारूतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title :- Kolhapur Wrestler Died | kolhapur wrestler died only 23 year old wrestler dies during practice in kolhapur

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’, राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हाध्यक्षाचा ई-मेलवरुन राजीनामा

Shivsena | धनुष्यबाण कुणाला मिळणार सेना की शिंदे गट? निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिली ही डेडलाईन

Pune Crime | महिलांच्या लैंगिक छळवणूक प्रकरणात Coca-Cola कंपनीने घेतलेला ‘तो’ निर्णय औद्योगिक न्यायालयाकडून कायम, याचिकाकर्त्याचा अर्ज फेटाळला

 

Related Posts