IMPIMP

Kondhwa Pune Crime News | ‘आम्ही इथले भाई म्हणत’ गाड्या फोडत अल्पवयीन मुलांनी माजवली कोंढव्यात दहशत

Kondhwa-Police

पुणे : Kondhwa Pune Crime News | रस्त्याकडेला लावलेल्या कार, दुचाकी यांच्या काचा फोडत अल्पवयीन मुलांनी कोंढव्यात दहशत माजवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Vandalism of Vehicles)

याबात खडक बहादूर बिस्टा (वय ४९, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर सलीम शेख (वय २१, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), अमर अकबर शेख (वय १९, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) व त्यांच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोेंढव्यातील शिवनेरीनगरमधील (Shivneri Nagar Kondhwa) गल्ली नंबर ३६ मध्ये बुधवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व इतरांनी त्यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेला पार्क केल्या होत्या. अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांनी आरडा ओरडा करत हातात कोयते, लोखंडी हत्यार घेऊन ते हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत, असे बोलत दहशत पसरविली. फिर्यादी यांची कार, संतोष भगवान चव्हाण यांची कार, बाळासाहेब दत्तात्रय जाधव यांची कार तसेच मुन्नाराम चौधरी यांच्या २ मोटारसायकली अशा वाहनांवर हातातील कोयते मारुन काचा फोडल्या. मोटारसायकलीची हेडलाईट व मडगार्ड तोडून फोडून नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.