IMPIMP

Unique Land Parcel Identification Number Project | आता एका क्लिकवर जमिनीची सर्व माहिती मिळणार; जाणून घ्या

by nagesh
land purchase unique land parcel identification number project pune news

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Unique Land Parcel Identification Number Project | जमीन खरेदी – विक्री (Land Purchase And Sale) करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भुखंड खरेदीदरम्यान फसवणूक न होण्यासाठी आता भूआधार क्रमांक म्हणजेच यूएलपीएन क्रमांक (ULPN Number) मिळणार आहे. त्यामुळे एका क्लिकवर जमिनीची सर्व माहिती मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर आता यूएलपीएन क्रमांक देण्याची मोहीम राबवली जात आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वच जमिनींना भूआधार मिळणार असल्याने जमीन खरेदी करतेवेळी फसवणूकीला आळा बसणार आहे. तर, पुण्यात (Pune News) जून महिन्यामध्ये ही योजना पूर्ण होणार आहे.

राज्यातील सर्व सातबारा (7/12) मिळकत पत्रिकांना भूआधार मिळणार असल्याने सातबाऱ्याचा क्यूआर कोड (QR Code) स्कॅन केल्यानंतर त्याची माहिती उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर प्रकल्प सुरु होत आहे. विशेष म्हणजे राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व जमिनीच्या खरेदी – विक्रीसाठी आता भूआधार 11 – अंकी क्रमांक देण्यात येणार आहे. (Unique Land Parcel Identification Number Project)

महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra State Government) याला अंतिम मंजुरी येणे बाकी आहे. ही मोहीम राज्यभरातही राबवली जात आहे. पुण्यात जून महिन्यामध्ये योजना पूर्ण होणार आहे. त्यामुळे यापुढे भूआधार यूएलपीएन क्रमांक देण्यात आल्याने जमीन खरेदीतील फसवणूकीला आता आळा बसणार आहे. भूआधार क्रमांक ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागांसाठी भविष्यात व्यवहारांसाठी राखीव ठेवण्यात आलेत. हे क्रमांक कागदपत्राच्या उजव्या बाजूला दिसतील. त्यांच्याकडे जमिनीच्या पार्सलचे सर्व तपशील असलेले QR कोडही असणार आहेत. तसेच, ही माहिती भूआधार पोर्टलवरही उपलब्ध असेल.

Web Title :- land purchase unique land parcel identification number project pune news

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Crime | बनावट कागदपत्राद्वारे बँकेची 98 लाखांची फसवणूक ! पुण्यातील वकिलासह दोघांवर गुन्हा दाखल

Ajit Pawar | उद्घाटनाला पोहोचताच अजित पवारांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी; म्हणाले – ‘मला बोलावताना विचार करा, मी तुमचा…’ (व्हिडीओ)

Link Ration Card With Aadhaar | रेशन कार्ड धारकांनी लवकरच करावं ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठं नुकसान; जाणून घ्या

Maharashtra Monsoon Weather Update | मान्सून लवकरच धडकणार; ‘या’ तारखेला महाराष्ट्रात बरसणार सरी? – IMD

PM Awas Yojana | पीएम आवास योजनेंतर्गत मिळणार तिप्पट जादा रक्कम ?; जाणून घ्या मोदी सरकारचा प्लॅन

Related Posts