IMPIMP

Latur ACB Trap | प्रधानमंत्री पीक विम्याच्या कामासाठी लाच घेणारे एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे दोन प्रतिनिधी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Pune ACB Trap | Two arrested along with a legal consultant who took bribe of 40 thousand for giving favorable report

लातूर : सरकारसत्ता ऑनलाइन  शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत (Pradhan Mantri Pik Vima Yojana) जास्तीचे नुकसान दाखवून, अधिक आर्थिक लाभ मिळवून देतो, असे म्हणून लाचेची मागणी (Demanding a Bribe) करणार्‍या एका कंपनीच्या तालुका प्रतिनिधीला लाच घेताना (Accepting Bribe) लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा (Latur ACB Trap) रचून रंगेहाथ पकडले. लातूर एसीबीच्या युनिटने (Latur ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.3) एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी लि. च्या चाकूर (Agriculture Insurance Company Ltd) कार्यालयात करण्यात आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

टॅलेंट प्रो. पीपल रिसोर्स सोल्युशन्स कंपनीचा (Talent Pro. People Resource Solutions Company) फिल्ड सुपरवायझर (Field Supervisor) संदीप जालिंदर बानाटे Sandeep Jalandar Banate (वय 28) असे अटक केलेल्या तालुका प्रतिनिधीचे नाव आहे. त्याच्या साथीदार अंगद मोहनराव कांबळे Angad Mohanrao Kamble (वय 36) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात (Chakur Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार शेतकर्‍याकडे प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या विम्याचा अधिकचा लाभ मिळवून देण्यासाठी मोबदला म्हणून 3 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लातूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Latur ACB Trap) तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर चाकूर येथे पथकाने सोमवारी सापळा लावला. संबंधित शेतकर्‍याकडून 3 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना बानाटे याला रंगेहाथ पकडण्यात आले. बानाटे याने कांबळे याला लाचेची रक्कम स्वीकारल्याबाबत फोन करुन कळविले.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे (Nanded ACB) पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे
(SP Dr. Rajkumar Shinde), अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण
(Addl SP Dharamsingh Chavan), लातूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड
(Deputy Superintendent of Police Pandit Rejitwad) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली (Police Inspector Bhaskar Pulli), पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर
(Police Inspector Anwar Mujawar), पोलीस हवालदार रमाकांत चाटे, फारुख दामटे, भागवत कठारे,
पोलीस नाईक संतोष गिरी, श्याम गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, दीपक कलवले, संदीप जाधव,
मंगेश कोंडरे, गजानन जाधव, रुपाली भोसले, राज महाजन यांच्या पथकाने केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Latur ACB Trap | Two representatives of Agriculture Insurance Company who took bribe for Prime Minister’s crop insurance work in anti-corruption net

हे देखील वाचा :

Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या धडकेत पाच जण जागीच ठार

T20 World Cup 2023 वेळापत्रक जाहीर ! ‘या’ दिवशी होणार भारत पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना

Pune Crime | टोळक्याने मारहाण करुन वर्गणीचे पैसे लुटले; कोथरुड परीसरातील घटना

Related Posts