IMPIMP

LIC Aam Aadmi | ‘एलआयसी’चा सर्वात स्वस्त प्लान ! अवघ्या 200 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर हजारोंचा फायदा; जाणून घ्या

by nagesh
 LIC Aam Aadmi | aaby lic aam aadmi bima scheme premium life insurance

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Aam Aadmi | विमा म्हणजे इन्श्युरन्स मग तो जीवनाचा असो की आजारपणाचा, सध्या काळाची गरज बनला आहे. मनुष्य गरीब असो की श्रीमंत, कोरोना काळाने इन्श्युरन्सचे महत्व चांगल्या प्रकारे समजावले (LIC Aam Aadmi) आहे. कोणतीही दुर्घटना किंवा महामारीमुळे एखाद्या गरीब कुटुंबाला जास्त समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकारने अनेक प्रकारच्या विमा योजना सुरू केल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ग्रामीण भागातील गरीबांसाठी योजना
अशीच एक योजना आहे एलआयसी आम आदमी विमा योजना (LIC Aam Aadmi Bima Scheme). एलआयसीची आम आदमी योजना ग्रामीण भागातील अशा लोकांसाठी सुरू केली आहे, ज्यांच्याकडे शेतीची जमीन नाही. मेहनत-मजूरी करून ते कुटुंबाचे पालन-पोषण करतात. अशा लोकांमध्ये मच्छिमार, रिक्षा चालक, विटभट्टी कामगार इत्यादींचा समावेश आहे.

48 प्रकारच्या मजूरांना लाभ
या योजनेत वर्षात केवळ एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि पूर्ण वर्षभर विमा कव्हर मिळते. हा भूमिहीन लोकांसाठी सुरू केलेला टर्म इन्श्युरन्स आहे. 48 प्रकारच्या व्यवसायात करणार्‍या मजूरांना योजनेचा लाभ दिला जातो. या विमा योजनेचे अनेक फायदे आहेत.

मृत्यु आणि दुर्घटना विमा
एलआयसी आम आदमी विमामध्ये (LIC Aam Aadmi) गुंतवणूक करणार्‍या लोकांना जीवन विमा कव्हरेज (Insurance Coverage) मिळते, सोबतच जर कुटुंब प्रमुखाचे नैसर्गिक कारणामुळे मृत्यू (Death benefits) झाल्यास किंवा दुर्घटनेमुळे कायमस्वरूपी किंवा अंशता अपंगत्व आले तर अशावेळी कुटुंबाला इन्श्युरन्स कव्हर मिळते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

इतके मिळेल विमा संरक्षण
नैसर्गिक कारणामुळे कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास एकरकमी 30 हजार रुपयांची विमा रक्कम मिळते.
याशिवाय दुर्घटनेत मृत्यू (accidental benefit) होण्याच्या स्थितीत 75,000 रुपये कुटुंबाला दिले जातात.
पूर्ण अपंगत्व आल्यास 75,000 रुपये, मानसिक प्रकारे अपंगत्व आल्यास 37,500 रुपये आणि मृत व्यक्तीच्या 2 मुलांना 100 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती (Scholarship) सुद्धा दिली जाते.

कोण करू शकतात विमा आणि काय आहे प्रीमियम
एलआयसी आम आदमी विमा योजनेत विमा कव्हरेज घेण्यासाठी वय 18 ते 59 वर्षाच्या दरम्यान असावे.
नॉमिनीचे नाव द्यावे. वार्षिक 200 रुपये प्रीमियम भरावा लागतो. अर्धा प्रीमियम राज्य सरकार भरते.

ही कागदपत्र आहेत आवश्यक
एलआयसी आम आदमी विमा योजनेंतर्गत विमा काढण्यासाठी आधार कार्ड, ओळख पत्र, रेशन कार्ड,
जन्म दाखला, मोबाइल नंबर आणि पासपोर्ट साइज फोटोची आवश्यकता असते.

Web Title :- LIC Aam Aadmi | aaby lic aam aadmi bima scheme premium life insurance

हे देखील वाचा :

Pune Crime | 11 गंभीर गुन्ह्यातील आरोपी अ‍ॅड. सागर सुर्यवंशीची येरवडा जेलमध्ये रवानगी

Pune RTO | पुणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार, RTO कडून रिक्षाच्या दरवाढीस मंजुरी; जाणून घ्या किती रुपये वाढणार

Pune Anti Corruption | 2.5 लाखाची लाच घेताना पुण्यातील शिक्षण संस्थेच्या महिला अध्यक्षासह तिघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, शैक्षणीक क्षेत्रात प्रचंड खळबळ

Related Posts