IMPIMP

LIC Bhagya Lakshmi Plan | कमी उत्पन्न असलेल्यांसाठी LIC ची ‘ही’ योजना आहे एकदम खास, मॅच्युरिटवर मिळतो 110 टक्के रिटर्न

by nagesh
LIC Unclaimed Money | lic have 20000 crores of unclaimed money this amount is more than the market cap of 5 companies of tata group

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Bhagya Lakshmi Plan | भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात विश्वासार्ह आणि जुनी विमा कंपनी आहे, ज्यावर देशातील लाखो लोकांचा विश्वास आहे. या विश्वासाचे कारण म्हणजे एलआयसी चांगल्या भविष्यासाठी लोकांच्या गरजेनुसार वेळोवेळी विमा पॉलिसी ऑफर करत असते. (LIC Bhagya Lakshmi Plan)

या पॉलिसीमध्ये एलआयसीने कमी उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांनुसार विभागणी केली आहे. आज आम्ही तुम्हाला कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी आणलेल्या भाग्य लक्ष्मी योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला चांगला रिटर्न मिळतो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एलआयसी भाग्य लक्ष्मी योजना –
LIC ची भाग्य लक्ष्मी योजना ही एक अतिशय खास योजना आहे जी कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी उपयुक्त ठरते. या विमा पॉलिसीमध्ये, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना मर्यादित कालावधीत कमी पैशात उच्च रिटर्न मिळू शकतो. एलआयसीच्या भाग्य लक्ष्मी योजनेबद्दल जाणून घेऊया. (LIC Bhagya Lakshmi Plan)

वैद्यकीय चाचणी आवश्यक
एलआयसीच्या भाग्य लक्ष्मी योजनेत पॉलिसी घेण्यापूर्वी, विमाधारकाला वैद्यकीय चाचणी घ्यावी लागते. तुम्ही वैद्यकीय चाचणीशिवाय विमा पॉलिसी घेण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला ही पॉलिसी मिळणार नाही. एलआयसीची भाग्य लक्ष्मी पॉलिसी 110% रिटर्न देते, जी मॅच्युरिटीच्या वेळी मिळते.

हे लोक घेऊ शकतात विमा पॉलिसी –
एलआयसीच्या भाग्य लक्ष्मी पॉलिसीमध्ये किमान 19 वर्षे आणि कमाल 55 वर्षे वयाचे लोक गुंतवणूक करू शकतात.
ही विमा पॉलिसी किमान 5 वर्षे आणि कमाल 13 वर्षांसाठी करता येते. या पॉलिसीमध्ये विमाधारकाला प्रीमियम पेमेंटपेक्षा दोन वर्ष अधिक कव्हर करते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मॅच्युरिटीवर मिळेल इतका रिटर्न –
भाग्य लक्ष्मी पॉलिसीवर किमान 20,000 रुपयांचा रिटर्न मिळतो. त्याच वेळी, यामध्ये जास्तीत जास्त 50,000 रुपयांचा रिटर्न मिळेल.
या पॉलिसीमध्ये, विमाधारकास सुमारे 110 टक्के रिटर्न मिळतो.

जर एखाद्या विमाधारकाने 1 वर्षाच्या आत आत्महत्या केली तर त्याला या विम्याचा लाभ मिळणार नाही.
परंतु, 1 वर्षानंतर अशी घटना घडल्यास, विमाधारकाच्या नॉमिनीला संपूर्ण रक्कम मिळेल.
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला कर्ज घेण्याची सुविधा मिळत नाही.

Web Title :- LIC Bhagya Lakshmi Plan | scheme of lic is very special for low income earners 110 return is available on maturity

हे देखील वाचा :

BJP | भाजपाचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा दरोडा’

Pimpri Corona Updates | रुग्णसंख्येत मोठी वाढ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4094 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anurag Thakur | ‘अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्स अन् वेबसाईटवर बंदी’ – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

Related Posts