IMPIMP

LIC Jeevan Labh Policy | एलआयसीची ‘ही’ योजना दररोज 260 रुपयांच्या गुंतवणुकीवर 20 लाख रुपये देईल, जाणून घ्या अटी आणि नियम

by nagesh
LIC Jeevan Labh Yojana | this scheme of lic will give you 20 lakhs on investment of rs 252 just have to wait for so many years

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Jeevan Labh Policy | कोरोनाचा (Covid-19) परिणाम गुंतवणूकदारांवरही झाला आहे, लोकांना गुंतवणूक सुरक्षित ठिकणी करायची असते जेथे कमी जोखीम पत्करावी लागेल. तसेच, त्यांना मॅच्युरिटी कालावधीत जास्त पैसे मिळवायचे असतात. तुम्हीही अशा योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही LIC च्या जीवन लाभ पॉलिसीमध्ये (LIC Jeevan Labh Policy) गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही दररोज बचत करून या योजनेत 260 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 20 लाखांची रक्कम मिळेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय आहे जीवन लाभ पॉलिसी ? (What is LIC Jeevan Labh Policy)
भारतीय आयुर्विमा महामंडळाची ही पॉलिसी एक टर्म पॉलिसी आहे. ज्यामध्ये तीन अटी दिल्या आहेत, यामध्ये तुम्ही 16 वर्षे, 21 वर्षे आणि 25 वर्षे टर्म मध्ये गुंतवणूक करू शकता. तर तुम्हाला 10 वर्षे, 15 वर्षे आणि 16 वर्षे प्रीमियम भरावा लागेल. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मासिक ,त्रेमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक पर्याय दिले जातात . तुम्ही मासिक आधारावर गुंतवणूक केल्यास,उशीरा पेमेंटसाठी ग्रेस पीरियड दिला जातो . त्रैमासिक आणि सहामाहीसाठी 30 दिवसांचा जास्त कालावधी आहे.

या योजनेचे खास वैशिष्ठे (Benefits of LIC Jeevan Labh) –
या पॉलिसीमध्ये 8 ते 59 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते.
गुंतवणुकदाराचा मृत्यू झाल्यास, विमा रकमेइतकी रक्कम नॉमिनीला दिली जाते.
या योजनेतील कर लाभ देखील गुंतवणूकदारांना इनकम टॅक्स कायदा 80C अंतर्गत सूट देण्यात येते.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
ही पॉलिसी घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही एलआयसी एजंट किंवा कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कसे मिळवायचे 20 लाख रुपये –
या पॉलिसी अंतर्गत, जर तुम्ही दररोज 260 रुपये गुंतवले आणि वयाच्या 20 व्या वर्षी 25 वर्षांच्या टर्म प्लॅन निवडला तर, मॅच्युरिटी पिरिअड वयाच्या 45 व्या वर्षी बनेल आणि तुम्हाला 16 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.
तुम्ही दररोज 260 रुपयांची बचत करून मासिक 7,800 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील.

Web Title :-  LIC Jeevan Labh Policy | this scheme of lic will give 20 lakh rupees on a daily investment of rs 260 detail here Jeevan Labh Policy

हे देखील वाचा :

Makar Sankranti 2022 | मकर संक्रांतीचे पौराणिक महत्त्व काय आहे? या दिवशी भीष्म पितामह यांनी केला होता देह त्याग

Makar Sankranti 2022 | मकर संक्रांत 14 किंवा 15 जानेवारीला कधी आहे? जाणून घ्या पूजेचे विधी

Pune Police Corona | पुणे पोलीस दलातील 232 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित

Related Posts