IMPIMP

LIC Policy Rules | एलआयसी पॉलिसीचे हे काम लवकर करा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, बदलले नियम; जाणून घ्या

by nagesh
LIC Jeevan Pragati Plan | jeevan pragati plan of lic will give the benefit of 28 lakhs on your savings of rs 200

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलआयसी पॉलिसी (LIC Policy Rules) खरेदी करताना, कुटुंबातील सदस्याला नॉमिनी (Life Insurance Policy Nominee) बनवणे आवश्यक आहे. हा नियमही अनिवार्य झाला असून नॉमिनी केले नसेल आणि एखादी दुर्घटना घडली असेल, तर कुटुंबीयांना रकमेपासून वंचित राहावे लागू शकते. जर नॉमिनीची नोंद केली तर कुटुंबाला कोणतीही अडचण येणार नाही आणि अनावश्यक विवाद सुद्धा टाळता येतील. (LIC Policy Rules)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

साधारणपणे लोक जोडीदाराला नॉमिनी बनवतात. पण पैसे दोन लोकांमध्ये म्हणजेच पत्नी आणि मुलगा किंवा पत्नी आणि भाऊ किंवा आई यांच्यात विभागायचे असतील तर एकापेक्षा जास्त पॉलिसी खरेदी (LIC Policy Rules) करू शकता आणि दोन पॉलिसींसाठी वेगवेगळे नॉमिनी तयार करू शकता. किंवा पॉलिसी खरेदी करताना तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तींचा हिस्सा ठरवू शकता आणि त्यांना नॉमिनी बनवू शकता. यासाठी पॉलिसी खरेदी करताना विमा कंपनीकडून (Insurance Company) लेखी हमीपत्र घेतले जाऊ शकते.

पॉलिसीधारक वेळोवेळी नॉमिनी देखील बदलू शकतो. जर नॉमिनी मरण पावला किंवा त्याला रोजगार मिळाला
आणि दुसर्‍या सदस्याला जास्त पैशांची गरज असेल, तर नॉमिनी बदलला जाऊ शकतो.
याशिवाय, विवाह किंवा घटस्फोट झाल्यास नॉमिनी देखील बदलू शकतो.

यासाठी विमा कंपनीच्या वेबसाइटवरून नॉमिनी फॉर्म डाउनलोड करा किंवा ऑफिसमधून हा फॉर्म घ्या.
फॉर्ममध्ये नॉमिनी व्यक्तीचे डिटेल्स भरा.
आता पॉलिसीच्या डॉक्युमेंट्सची कॉपी आणि नॉमिनीसोबतच्या तुमच्या नातेसंबंधाचे डॉक्युमेंट्स जोडून सबमिट करा.
जर एकापेक्षा जास्त नॉमिनी असतील तर प्रत्येकाचा हिस्सेदारी सुद्धा ठरवा.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- LIC Policy Rules | lic policy rules new life insurance policy nominee benefits see here how to change your nominee

हे देखील वाचा :

Beed ACB Trap | 7000 हजार रुपये लाच घेताना तलाठी आणि खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Murder Case | वडगाव बुद्रुक परिसरात मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसलेल्या मुलाचा खून करणारे अटकेत

Popular Front of India (PFI) | PFI वर दुसरी मोठी कारवाई ! 7 राज्यांत 200 ठिकाणांवर छापे; 170 जण ताब्यात, पुण्याच्या कोंढाव्यातून 6 जणांची धरपकड

Related Posts