IMPIMP

LIC Share Price | ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये घसरणीमुळे निराश आहात, JP Morgan चा हा रिपोर्ट तुमची चिंता दूर करेल

by nagesh
LIC | lic notice for policy holders fake information with regard to penalty charges for kyc update

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाLIC Share Price | एलआयसी (LIC) च्या शेअरची कामगिरी लिस्टिंगनंतर खुपच खराब सुरू आहे. एलआयसीच्या आयपीओमध्ये पैसे लावणार्‍या लाखो गुंतवणुकदारांचे मोठ्या प्रमाणात पैसा बुडाला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने पॉलिसी होल्डरचा समावेश आहे. लिस्टिंगनंतर हा शेअर 30 टक्केपेक्षा जास्त घसरला आहे. या दरम्यान जेपी मॉर्गनचा रिपोर्ट अंधारात दिव्यासारखा वाटत आहे. (LIC Share Price)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जेपी मॉर्गनने एलआयसीच्या शेअरची वाटचाल बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. याच्या अ‍ॅनालिस्टचे म्हणणे आहे की, सध्या एलआयसीच्या शेअरचे व्हॅल्यूएशन अ‍ॅट्रॅक्टिव्ह आहे. त्यांनी एलआयसीच्या शेअरसाठी 840 रूपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. हे टार्गेट मार्च 2023 साठी आहे.

जेपी मॉर्गन यांनी म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2023 मध्ये अंदाजे 0.75 पट एंटरप्राईज व्हॅल्यूसह हा इन्श्युरन्सचा सर्वात स्वस्त शेअर आहे. प्रायव्हेट सेक्टरच्या इन्श्युरन्स कंपन्यांच्या शेअरमध्ये 2-3 पटीवर व्यवहार होत आहे. मात्र, त्यांची ग्रोथ वेगाने होत आहे. (LIC Share Price)

जेपी मॉर्गनच्या रिपोर्टनुसार, एलआयसीच्या शेअरमध्ये सुमारे 200 रुपयांची तेजी येऊ शकते. सोमवारी एलआयसीचा शेअर कमजोरीत खुला झाला. परंतु, थोड्या वेळानंतर हिरव्या निशाणीत आला. 11.06 वाजता हा शेअर 0.14 टक्के तेजीसह 655.45 रूपयांवर वाटचाल करत होता.

शुक्रवारी एलआयसीचे मार्केट कॅपिटलायजेशन घसरून 4.13 लाख कोटी रूपये झाले होते. ती देशातील सर्वात जास्त व्हॅल्यूएशनच्या टॉप कंपन्यांच्या यादीतून बाहेर गेली आहे. ती सहाव्या स्थानावर आली आहे. लिस्टिंगपासून आतापर्यंत या शेअर इन्व्हेस्टर्सचे 1.87 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. 17 मे रोजी लिस्टिंगच्या दिवशी एलआयसीचे मार्केट कॅपिटलायजेशन 6 लाख कोटी होते. तेव्हा ही देशातील पाचवी सर्वात मोठी कंपनी होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एलआयसी आयपीओ 3 मे रोजी ओपन झाला होता. तो 9 मे रोजी बंद झाला. सरकारने या कंपनीतील आपली 3.5 टक्के भागीदारी विकून 21000 कोटी रुपये मिळवले होते. अँकर इन्व्हेस्टर्सने एलआयसीचे 5.93 कोटी शेअर खरेदी केले होते. कंपनीने 949 रूपयांवर इन्व्हेस्टर्सला शेअर जारी केले होते. अँकर इन्व्हेस्टर्समध्ये जास्त देशांतर्गत फंड्स होते. त्यांना आतापर्यंत 25 टक्केपेक्षा जास्त लॉस झाला आहे.

एलआयसीच्या आयपीओमध्ये देश आणि परदेशातील अँकर इन्व्हेस्टर्सने पैसे लावले होते.
यामध्ये गव्हर्मेंट ऑफ सिंगापूर, एसबीआय म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड आणि अ‍ॅक्सिस म्यूच्युअल फंडचा समावेश होतो.
परंतु, जास्त गुंतवणूक देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी केली आहे.
या इश्युमध्ये म्युच्युअल फंडच्या 99 स्कीममध्ये 4000 कोटी रूपये मूल्याचे शेअर खरेदी केले होते.

या इश्युमध्ये एलआयसीच्या पॉलिसी होल्डर्सने खुपच जास्त रूची दाखवली होती.
पॉलिसी होल्डर्सचा कोटा सहापट सबस्क्राईब झाला होता. याचे कारण डिस्काऊंट होते.
कंपनीने आपल्या पॉलिसी होल्डरर्सला प्रति शेअर 60 रूपयांचा डिस्काउंट दिला होता.
रिटेल इन्व्हेस्टर्सला प्रति शेअर 45 रूपयांचा डिस्काऊंट मिळाला होता. या कारणामुळे रिटेल इन्व्हेस्टर्सने सुद्धा या इश्यूमध्ये चांगली रुची दाखवली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- LIC Share Price | are you worried about fall in lic shares know this report of jp morgan

हे देखील वाचा :

Pune PMC News | पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज ! वारकर्‍यांच्या आरोग्याला महापालिकेचे प्राधान्य; महिला वारकर्‍यांना सॅनेटरी नॅपकिनचे मोफत वाटप करणार

Vidhan Parishad Election 2022 | हितेंद्र ठाकूर यांची संजय राऊतांना चपराक; म्हणाले – ‘तुमच्यात हिंमत असेल तर…आमदार काय मच्छिबाजार वाटला का ?’

Premium Financing | इन्श्युरन्स प्रीमियम आता ओझे नाही, भरण्यासाठी मिळेल कर्ज, जाणून घ्या नवीन नियम

Related Posts