IMPIMP

Lose Thigh Fat | मांड्यांवर वाढली असेल चरबी तर ‘या’ 5 एक्सरसाईजने करा कमी; जाणून घ्या

by nagesh
Lose Thigh Fat | 5 best exercises that can reduce fat your thighs

सरकारसत्ता ऑनलाइन – Lose Thigh Fat | वाढत्या लठ्ठपणा (Obesity) मुळे व्यक्तिमत्व खराब होते. लठ्ठपणा केवळ पोटाच्या चरबीनेच (Belly Fat) दिसत असे नाही, तर जाड मांड्या (Thighs) सुद्धा वाईट दिसतात. मांड्यांवर जास्त चरबी (Fat On The Thighs) असल्याने त्या जाड दिसतात, तसेच चालण्यासही त्रास होतो. पायाच्या चांगल्या आरोग्यासाठी मांडीच्या स्नायूंना आकार देणे, टोनिंग करणे आणि मजबूत करणे आवश्यक आहे. मजबूत मांड्यांचा अर्थ म्हणजे तुम्ही वेगाने धावू शकता, उंच उडी मारू शकता आणि चालण्यास कोणतीही अडचण येत नाही (Lose Thigh Fat).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मांड्या मजबूत (Thighs Strong) करण्यासाठी काही व्यायाम (Exercise) खूप प्रभावी आहेत, जे करून मांड्यांवरची चरबी झपाट्याने नियंत्रित करता येते, तसेच मांड्या मजबूत होतात. मांडीची चरबी (Lose Thigh Fat) कमी असेल तर जीन्स तुमच्या पायात सुंदर दिसेल. मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी कोणते 5 व्यायाम प्रभावी आहेत ते जाणून घेवूयात (5 Exercises Are Effective For Reducing Thigh Fat)…

1. सायकल चालवा (Cycling) :
सायकलिंग हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे. यामुहे मांड्या टोन होतात, तसेच हृदयाचे आरोग्य (Heart Health) देखील सुधारते. सायकल चालवून वजन झपाट्याने कमी करता येते. सायकलिंगमुळे स्नायूंना बळकटी मिळते, तसेच तणावही कमी होतो.

2. धावणे किंवा चालणे (Run or Walk) :
मांड्यांची चरबी कमी करायची असेल तर दररोज किमान अर्धा तास धावा किंवा चाला. धावण्याने तुम्ही मांडीची चरबी झपाट्याने कमी करू शकता.

3. लिफ्टऐवजी पायर्‍यांचा वापर करा (Use stairs Not Elevators) :
मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी लिफ्टचा वापर न करता पायर्‍यांचा वापर करा. ऑफिसला गेलात तर पायर्‍या चढून ऑफिसमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. पायर्‍या चढल्याने चरबी कमी होईल आणि मांड्या पातळ होतील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

4. स्क्वॅट्स व्यायाम करा (Do Squats Exercise) :
मांडीची चरबी कमी करायची असेल तर स्क्वॅट्सचा व्यायाम करा. स्क्वॅट्स करण्यासाठी कोणत्याही उपकरणाची गरज नाही.
मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी, दररोज 20-30 मिनिटे स्क्वॅट्स (Squats) केल्याने मांड्यांची चरबी कमी होऊ शकते.

5. पोहायला जा (Do Swimming) :
मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही स्विमिंग देखील करू शकता. पोहताना फक्त पायांनीच पोहावे.
दररोज एक तास पोहण्याने तुमच्या मांड्यांवर झटपट प्रभाव दिसून येईल आणि मांड्या पातळ होतील.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Lose Thigh Fat | 5 best exercises that can reduce fat your thighs

हे देखील वाचा :

NGT Imposes Fine On Ekta Housing Pvt. Ltd | पुण्यातील एकता हाउसिंग प्रा. लि. कंपनीला हरित लवादाचा दणका ! ठोठावला 15 कोटी 99 लाखांचा दंड; बांधकाम बंद करण्याचे आदेश

Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील 6 दुकाने आगीत भस्मसात

Gas Problem And Acidity | गॅसची समस्या झाल्यास चॉकलेट खावे का? अ‍ॅसिडिटी आणि कोको पावडरमध्ये जवळचा संबंध; जाणून घ्या

Related Posts