IMPIMP

Low Haemoglobin Level | रक्ताची कमतरता असल्यास शरीर देते ‘हे’ 5 संकेत, ही लक्षणे आढळली तर व्हा सावध

by nagesh
Low Haemoglobin Level | warning signs of low haemoglobin level anemia

सरकारसत्ता ऑनलाइन – Low Haemoglobin Level | शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अनेकदा थकवा जाणवणे, अशक्तपणा आणि चक्कर येणे ही समस्या कमी हिमोग्लोबिनची लक्षणे आहेत. रक्ताच्या कमतरतेमुळे, तुम्ही अ‍ॅनिमियाला (Anemia) बळी पडू शकता. ही समस्या महिलांमध्ये जास्त आढळते. (Low Haemoglobin Level)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य ऑक्सिजनचा Supply करणे आहे. रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना बळी पडू शकते.

हिमोग्लोबिन कमी होण्याचे कारणे (Causes of low hemoglobin)
रोजच्या आहारात लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकते. महिलांमध्ये गर्भधारणेमुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ शकते. मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव हे याचे कारण असू शकते.

शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास जंक फूडचे सेवन टाळावे. जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळेही समस्या उद्भवू शकते, त्यामुळे जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमने युक्त असलेल्या गोष्टी खा.

या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
खूप थकवा जाणवणे. त्वचा पिवळी पडणे आणि कमकुवत वाटणे ही हिमोग्लोबिनच्या कमतरतेची लक्षणे आहेत. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास हृदयाचे ठोके जलद होण्याची समस्या देखील असू शकते. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. (Low Haemoglobin Level)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जेव्हा शरीरात रक्त कमी होते, तेव्हा ऑक्सिजनची कमतरता देखील असते.
यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि जडपणा जाणवू शकतो.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीरातील रक्ताभिसरण देखील कमी होऊ शकते.

कमी हिमोग्लोबिनमुळे डोकेदुखी आणि छातीत दुखू शकते. जेव्हा शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते
तेव्हा तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. अशा स्थितीत कोणतेही काम करताना थकवा लवकर येतो.

शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे संधिवात, कर्करोग आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो.

आहारात करा या गोष्टींचा समावेश
जर तुम्हालाही हिमोग्लोबिनच्या कमतरतेची समस्या असेल तर रोजच्या आहारात लोहाचे प्रमाण वाढवा.
रोजच्या आहारात मांस, मासे, सोयाबीन, टोफू, अंडी, नट, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, बीट, गाजर, बीटरूट यासारख्या गोष्टींचा समावेश करा.

यासोबतच ‘व्हिटॅमिन सी’ची (Vitamin C) कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्षे, लिंबू, संत्री, आंबा, किवी ही फळे खावीत.
डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे सप्लिमेंट घ्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Low Haemoglobin Level | warning signs of low haemoglobin level anemia

हे देखील वाचा :

Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 5705 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kiran Mane | प्रसिद्ध अभिनेता किरण माने आता शरद पवार यांची भेट घेणार

Taarak Mehta Ka Ooltah Chashma | तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये ‘या’ बोल्ड अभिनेत्रीची एंट्री, सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले फोटो

Related Posts