IMPIMP

Maharashtra Auto Rickshaw Licenses | राज्यभरात आता कोणालाही मिळणार नाही नवीन रिक्षाचालक परवाना…

by nagesh
Maharashtra Auto Rickshaw Licenses | No one will get a new rickshaw driver’s license across the state…

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Auto Rickshaw Licenses | येत्या काळात राज्यातील नवीन रिक्षांना परवाने देणे बंद केले जाणार आहे. राज्यात रिक्षांचे प्रमाण अतिशय वाढले असून यावर प्रतिबंध घालण्यासाठी ही पाऊले उचलण्यात आली आहे. परिवहन विभागातर्फे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाला (Union Ministry Of Roads And Transport) याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मंत्रालयाने जर यास परवानगी दिली तर राज्यातील नवीन रिक्षांना परवाना (Maharashtra Auto Rickshaw Licenses) देणे बंद केले जाणार आहे.

राज्यात रिक्षांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरांतर्गत वाहतूकीमध्ये रिक्षा महत्त्वाची भूमिका बजावत असली तरी तिची वाढती संख्या प्रदूषणाचे कारण बनते आहे. रिक्षाच्या वाढत्या संख्येमुळे सार्वजनिक वाहतूकीस (Public Transport) प्रेरणा देण्यास मर्यादा येते. त्याचबरोबर राज्यात वाढत चाललेल्या रिक्षाचालकांमुळे इतर रिक्षाचालकांचे प्रवासी कमी होऊ लागले आहे. आधीच इतर ऑनलाइन ॲपमुळे (Online App) रिक्षाचालकांना तोटा सहन करावा लागतो आहे, त्याचबरोबर वाढणारी रिक्षाचालकांची संख्या देखील त्यांच्या नफ्यातील भागीदार तयार करत आहे. त्यामुळेच आता नवीन रिक्षापरवाने (Rickshaw License) देण्यात येऊ नये अशी मागणी अनेक रिक्षा संघटना करत आहेत.

रिक्षा संघटनाच्या (Rickshaw Association) सततच्या मागणीनुसार परिवहन विभागाने
(Transport Department) पावले उचलत याबाबतचा प्रस्ताव तयार केला.
हा प्रस्ताव केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाकडे पाठवण्यात देखील आला आहे.
यावर मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या आदेशानंतर राज्यातील नवीन रिक्षांच्या परवान्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आपल्या राज्यात सर्वाधिक रिक्षा पुण्यात (Pune) आहेत. राज्यभरात 8 लाख रिक्षा आहेत. त्यातील तब्बल एक लाख रिक्षा पुण्यात आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये (PCMC) ३२ हजार 500 रिक्षा कार्यरत आहे. या निर्णयाचा परिणाम या क्षेत्रात नव्या येऊ इच्छिणाऱ्या लोकांवर होणार आहे.

Web Title : Maharashtra Auto Rickshaw Licenses | No one will get a new rickshaw driver’s license across the state…

Related Posts