IMPIMP

Maharashtra Band | राज्यात महाराष्ट्र बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद !

by nagesh
Maharashtra Band | Maharashtra bandh erupts in state

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Band | महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Band) राज्यात सर्वत्र उर्त्स्फुत प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आठवड्याचा पहिलाच दिवस असला तरी मुंबईत (Mumbai) चाकरमान्यांची रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून येत आहे. उपनगरातून नोकरीसाठी येणार्‍यांनी आज बंद पाहून घरीच थांबण्याचे पसंत केलेले दिसून येत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नाशिक (Nashik), वाशी (Washi), पुणे (Pune) येथील बाजार बंद (Market Yard Close) असून तेथे आज सकाळी कोणतीही आवक झाली नाही. सोलापूर बाजार (Solapur Market Yard) समितीमध्ये मात्र, बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.  बाजार समितीमध्ये नेहमीसारखीच मोठी गर्दी पहायला मिळाली. जिल्ह्यातील एस टी बस सेवाही सुरळीत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई, ठाणे (Thane), नवी मुंबईतील (Navi Mumbai) व्यापार्‍यांनी या बंदला पाठिंबा (Maharashtra Band) दिला आहे. येथील बेस्ट, पीएमपी बससेवा बंद आहे. टॅक्सी वाहतूक सुरु असली तरी तिला प्रतिसाद कमी आहे. ज्या रिक्षा, टॅक्सी सुरु आहेत. त्यांनी जादा पैसे घेण्यास सुरुवात करुन प्रवाशांच्या अडचणीत आणखीच भर टाकली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे -बंगलोर महामार्गावर शिवसेनेचे आंदोलन

कोल्हापूर शिवसेनेच्या (Kolhapur Shivsena) कार्यकर्त्यांनी पुणे -बंगलोर महामार्गावर (pune bangalore highway)
आंदोलन करुन रस्ता रोको केला. सकाळी सुमारे १० मिनिटे त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. महामार्गावरील वाहतूक रोखून धरली.
त्यानंतर पोलिसांनी या सर्व शिवसैनिकांना ताब्यात घेऊन रस्ता पुन्हा सुरु केला. महामार्गावरील वाहतूक अतिशय कमी आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातून या बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
त्यामुळे राज्यात दुपारपर्यंत जवळपास सर्व व्यवहार ठप्प असल्याचे दिसून येत आहे.

Web Title : Maharashtra Band | Maharashtra bandh erupts in state

हे देखील वाचा :

Sangli News | दुर्देवी ! पाझर तलावात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

TAMA Electric Car | 1947 मध्येच बनवण्यात आली होती टेस्लाच्या तोडीची इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या 130 वर्षांचा जुना इतिहास

Maharashtra Band | पुण्यात शासकीय यंत्रणेचा गैरवापरकरून बंद करण्याचा प्रयत्न – भाजप शहराध्यक्ष मुळीक

Related Posts