IMPIMP

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषदांमधील सदस्य संख्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

by nagesh
maharashtra-cabinet-decisions-cabinet-approves-launch-of-new-iti-at-yerawada-pune

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाइन –  राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढवण्याची गरज लक्षात घेऊन आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिका (Municipal Corporation) व नगरपिरषदांमधील (Municipal Council) निर्वाचित सदस्यांच्या (elected member) संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) घेण्यात आला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अध्यक्षस्थानी होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे.
तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान 17 सदस्य व कमाल 65 इतकी आहे.
महानगरांमधील व लहान नागरी क्षेत्रांमध्ये झालेले रचनात्मक परिवर्तन व नागरी समस्यांची उकल व विकास योजनांचा वेग वाढविणे यासाठी सर्व कार्यक्षेत्राला
योग्य न्याय देण्याच्या दृष्टीने सदस्य संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे.
कोविड-19 च्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत.
त्याला आणखी काही कालावधी लागणार आहे.
या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहित धरुन अधिनियमात (Act) नमुद केलेल्या महानगरपालिका व नगरपरिषदांच्या
किमान सदस्य संख्येत 17 टक्के इतकी वाढ (Increase)
करण्याचा निर्णय (Maharashtra Cabinet Decision) घेण्यात आला.
किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्या देखील वाढेल व त्यामुळे पर्याप्त सदस्य संख्या निश्चित होईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अशी असेल वाढ

– महानगरपालिकांमध्ये 3 लाखापेक्षा अधिक व 6 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 76 व अधिकतम संख्या 96 पेक्षा अधिक नसेल.

– 6 लाखापेक्षा अधिक व 12 लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 96 व अधिकत्तम संख्या 126 पेक्षा अधिक नसेल.

– 12 लाखापेक्षा अधिक व 14 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 126 व अधिकत्तम संख्या 156 पेक्षा अधिक नसेल.

– 24 लाखापेक्षा अधिक व 30 लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 156 व अधिकत्तम संख्या 168 पेक्षा अधिक नसेल.

– 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 168 व अधिकत्तम संख्या 185 पेक्षा अधिक नसेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नगरपरिषद सदस्य संख्या

– अ वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 40 व अधिक संख्या 75 हून अधिक नसेल.

– ब वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 25 व अधिक संख्या 37 हून अधिक नसेल.

– क वर्ग नगरपरिषदांमध्ये निवडून आलेल्या परिषद सदस्यांची किमान संख्या 20 व अधिक संख्या 25 हून अधिक नसेल.

Web Title : Maharashtra Cabinet Decision | Big decision in the friendly meeting regarding the number of members in Municipal Corporations and Municipal Councils

हे देखील वाचा :

Nawab Malik | नवाब मलिकांना रोखण्यासाठी याचिका, ‘या’ विनंतीवर हायकोर्ट म्हणाले…

Ulhasnagar BJP | उल्हासनगरमध्ये मोठा राजकीय भूकंप, 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Multibagger Stock | शॉर्ट टर्ममध्ये कमाईची मोठी ‘सुवर्ण’संधी ! ‘या’ स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा तज्ज्ञांचा सल्ला

Related Posts