IMPIMP

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

by nagesh
 Government Job Recruitment | state govt cancel the recruitment in animal husbandry department

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Cabinet Decision | ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र (caste validity certificate) सादर करण्यासाठी 12 महिन्यांची मुदतवाढ (Extension) देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) घेण्यात आला. त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीला आपले जात वैधता प्रमाणपत्र 31 डिसेंबर 2022 पर्यंत सादर करता येणार आहे. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेनंतर काढण्यात येणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत. आरक्षित प्रवर्गातून जे उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांनी अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याचा आदेश हायकोर्टाने (High Court) दिला आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) महानगरपालिका, नगरपरिषद उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक (Local Body Election) कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर 2022 अथवा त्यापूर्वीचा असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ज्या व्यक्तीने आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी (Caste Verification Certificate) पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल मात्र अर्ज दाखल करण्याच्या वेळेस त्या व्यक्तीस जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नसेल अशा उमेदवाराला निवडणुकीत विजय मिळाल्यास 12 महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करणार असल्याची हमी द्यावी लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द करण्यात यावी या तरतुदीला देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet Decision)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिकाप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषद (Zilla Parishad),
पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) जागा वाढवण्यात येणार आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये साधारणपणे 6 ते 7 टक्के जागा वाढणार आहेत.

Web Title :- Maharashtra Cabinet Decision | extension of submission of caste validity certificate for local body election candidates

हे देखील वाचा :

Pune Corporation | प्रभाग रचनेचा कच्चा आराखडाच अद्याप अपूर्ण ! आराखडा सादर करण्यास मुदतवाढ?

Pension Scheme SWP | करोडपती बनण्याचा हिट फॉर्म्युला ! 100 रुपये वाचवा आणि मिळवा 35,000 मासिक पेन्शन, येथे जाणून घ्या कॅलक्युलेशन

Gold Silver Price Today | महिन्याच्या अखेर सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Related Posts