IMPIMP

Maharashtra Cabinet Decision | प्रभाग पध्दतीवर ठाकरे मंत्रिमंडळाचे ‘शिक्कामोर्तब’ ! मनपा, नगरपालिका अन् नगर पंचायतीमध्ये ‘या’ पध्दतीची असेल ‘रचना’

by nagesh
Maharashtra Cabinet Decision | thackeray government insists on ward system decision in municipal elections no change

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबई वगळता (BMC) राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray government) घेतला होता. परंतु हा निर्णय बदलण्यात येईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आता महापालिकांच्या (Municipal Corporation) प्रभाग पद्धतीत (ward system) कोणताही बदल होणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Decision) यावर चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये (Maharashtra Cabinet Decision) प्रभाग पद्धतीमध्ये कोणताही बदल न करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये (municipal election) तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेरविचार होईल (Maharashtra Cabinet Decision) असे स्पष्ट संकेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिले होते.
पण महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत.

महापालिकेत तीन ऐवजी दोन सदस्य प्रभाग पद्धत असावी अशी मागणी काँग्रेसच्या (Congress) वतीने करण्यात आली होती.
काँग्रेसच्या या मागणीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यावेळी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती.
परंतु प्रभाग रचनेत कोणताही बदल न करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने कायम ठेवला.
त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये तीन सदस्य प्रभाग पद्धत कायम राहणार आहे.

महत्तवाचे म्हणजे, तीन प्रभाग रचनेसंदर्भातील निर्णयाबाबत आघाडी सरकारमध्ये कोणतेही वाद नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) हे यावर नक्कीच तोडगा काढतील.
प्रभाग 3 चा असाव की 2 याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, कॅबिनेटमध्येच यावर अंतिम निर्णय होईल.
आघाडी सरकारमधील काही घटकांनी वेगवगेळी मतं नोंदवली होती.
यावर मुख्यमंत्री सर्वमान्य निर्णय घेतील, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु आता हा निर्णय कामय राहणार आहे.

हे आहेत निर्णय

– मुंबईत 1 वार्ड पद्धत

– राज्यातील उर्वरित महापालिका 3 सदस्य प्रभाग

– नगरपालिका नगर परिषद 2 सदस्य प्रभाग

– नगर पंचायतीला वार्ड नुसार सदस्य असतील

Web Title : Maharashtra Cabinet Decision | thackeray government insists on ward system decision in municipal elections no change

हे देखील वाचा :

Stock Market | रतन टाटा यांच्या कंपनीचे झाले 21400 कोटींचे नुकसान, मुकेश अंबानी यांना झाला मोठा फायदा; जाणून घ्या नेमकं काय झालं

TATA Group च्या ‘या’ 2 शेयरमधून राकेश झुनझुनवाला यांनी एका महिन्यात कमावले 893 कोटी रुपये, तुमच्याकडे आहे का?

Modi Government | आता बिगर सरकारी लोकांना सुद्धा मिळू शकते मोदी सरकारकडून पेन्शन, करावे लागेल या अटींचे पालन

Related Posts