IMPIMP

Maharashtra Cabinet Decisions | राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

by nagesh
Maharashtra Political News | bjp leader devendra fadnavis reaction on cm eknath shinde upset uday samant

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Cabinet Decisions | राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्ती वेतन (Freedom Fighters’ Pension) दुप्पटीने वाढवण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) घेतला आहे. या निर्णयामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना दरमहा 20 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Decisions) हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) (Maharashtra Cabinet Decisions )

– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Samriddhi Highway) बांधकामासाठीचे गौण खनिज बाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

– कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मुल्याधारित, मालमत्ता दर न बदलण्याचा निर्णय. (नगर विकास विभाग)

– सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नाथवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देणार. 107.99 कोटी खर्चास सुधारित मान्यता. 500 हेक्टर जमिनीला फायदा. (जलसंपदा विभाग)

– राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविले. आता मिळणार दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना लाभ मिळणार. (सामान्य प्रशासन विभाग)

– मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे मुख्य न्यायमुर्ती यांचे अतिरिक्त सचिव ही पदे निर्माण करण्यास मान्यता. (विधी व न्याय विभाग)

– नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करणार. २ हजार ५८५ लाखाचा निधी देण्याचा निर्णय. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

– अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

– ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. अधिसंख्य पदावर सामावून घेणार. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

– “जेएसपीएम विद्यापीठ, पुणे” (JSPM University, Pune) या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

– राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु , प्र कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहीत केल्याप्रमाणे होणार. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

– नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी आता १५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येईल. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

– महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ३५ हजार ६२९ कोटी रुपये कर्जरूपाने उभारण्यास मंजूरी. भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

– एसईबीसी (SEBC) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या. 9 सप्टेंबर 2020 नंतरच्या निवड प्रक्रियेस मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)

– आता मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतात. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार. (पणन विभाग)

– आता पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस- आयओएन, व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेणार. भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा. (सामान्य प्रशासन विभाग)

Web Title :- Maharashtra Cabinet Decisions | important 15 decision in shinde fadnavis government cabinet meeting in mumbai

हे देखील वाचा :

Actress Jasmine Dhunna | वीराणा चित्रपटात ‘डायन’ बनून गायब झाली ही अभिनेत्री, पण तिच्या सौंदर्यावर फिदा होता अंडरवर्ल्ड डॉन

Maharashtra Politics | “भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर…” राहुल गांधींचे महाराष्ट्र सरकारला आव्हान

Pune Pimpri Crime | इंस्टाग्रामवरील ओळखीतून तरुणीला घातला 40 लाखांचा गंडा, सांगवी परिसरातील घटना

Related Posts