IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | ‘संजय राठोडांना मंत्री करणं हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय’ – भाजप

by nagesh
Sanjay Rathod | shivsena thackeray and shinde group mla in contact says sanjay rathod

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Cabinet Expansion | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन 40 दिवस झाल्यानंतर अखेर आज मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) मुहूर्त मिळाला. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपच्या (BJP) 9 तर शिंदे गटाच्या (Shinde Group) 9 आमदारांनी शपथ घेतली. मात्र, पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pune Pooja Chavan Suicide Case) मागील मंत्रिमंडळातून राजीनामा (Resignation) द्यावा लागलेल्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांना नव्या सरकारने पुन्हा एकदा मंत्री केले आहे. यावरून शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीने (NCP) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. परंतु संजय राठोड यांना मंत्री करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता, असे सांगत भाजपने हात वर केल्याचे सांगितले जात आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आजच्या मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Expansion) यवतमाळ मधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची (Cabinet Minister) शपथ घेतली. त्यामुळे आता ते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहेत. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलन केलं होतं तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. नव्या शिंद-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झालेल्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली.

राठोड यांना मंत्री करणं हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
संजय राठोड यांना मंत्रिमंडळात मिळालेल्या स्थानाबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतलेला आहे.
मला वाटते की, चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे.
त्या आधीपासून याबाबत आवाज उठवत आहेत, त्याबाबत संदेह नाही.
मात्र, त्या प्रकरणाची चौकशी झालेली आहे किंवा सुरु आहे. प्रथमदर्शनी त्यांनाही त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे.
म्हणून मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला आहे. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याबाबतही आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
पण त्यांनी सांगितले आहे की, मुख्यमंत्र्यांनी कोणाच्याही माध्यमातून उच्चस्तरीय समिती नेमावी आणि चौकशी करावी, असे महाजन म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | bjp girish mahajan clears that cm eknath shinde took decision to include sanjay rathod in cabinet

हे देखील वाचा :

8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगावर मोठी अपडेट, DA बाबत सरकारने संसदेत काय सांगितले, जाणून घ्या

Maharashtra Cabinet Expansion | सत्तांतराच्या नाट्यानंतर 40 दिवसांनी महाराष्ट्राला मिळाले 20 कारभारी, जाणून घ्या शिंदे-फडणवीसांच्या ‘शिलेदारां’ बाबत

Chitra Wagh On Sanjay Rathod | ‘संजय राठोडला मंत्रीपद देणं दुर्दैवी, तो मंत्री झाला असला तरी…’, चित्रा वाघ संतापल्या

Related Posts