IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | 5 स्टार हॉटेलमध्ये बैठक ! 100 कोटी द्या, कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देतो; राहुल कुल यांच्यासह भाजपच्या 3 आमदारांना ऑफर देणाऱ्या चौघांना अटक

by nagesh
Maharashtra Cabinet Expansion | mumbai police crime branch arrests four who made promise to provide cabinet minister post crime news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन महाराष्ट्रातील सत्ता नाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. आता शिंदे-फडणवीस सरकारपुढे मंत्रिमंडळ विस्ताराचं (Maharashtra Cabinet Expansion) आव्हान आहे. 15 दिवसांहून अधिक काळ झाला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका प्रलंबित असल्याने मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रखडला असल्याचे बोलले जात आहेत. त्यातच अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केल्याची माहिती पुढे येत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रखडल्याने विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच काही महाठगांनी एका आमदारला (MLA) मंत्री बनवण्यासाठी जाळ्यात अडकवण्याचं षडयंत्र उघड झाले आहे. एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरुन मुंबई क्राईम ब्रांचनं (Mumbai Police Crime Branch) 4 आरोपींना अटक (Arrest) केली आहे. रियाज शेख (Riaz Sheikh), योगेश कुलकर्णी (Yogesh Kulkarni), सागर संगवई (Sagar Sangwai) आणि जाफर उस्मानी (Jafar Usmani) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. किला कोर्टाने (Killa Court) या सर्व आरोपींना 26 जुलैपर्यंत क्राईम ब्रांच कस्टडीत पाठवले आहे.

तक्रारीनुसार, आमदार ते कॅबिनेट मंत्री बनण्यासाठी आरोपींनी 100 कोटींची मागणी केली होती. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठक झाली. मुंबई क्राईम ब्रांचने मंगळवारी किला कोर्टात या प्रकरणात खुलासा केला. आरोपी रियाज शेख याने आमदाराच्या सचिवाला अनेकवेळा फोन करुन आमदारांची 4 वाजात बैठक आहे मात्र ते फोन उचलत नाही अशी बतावणी केली. त्याच संध्याकाळी 4.30 वाजता दक्षिण मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये बैठकीला बोलावले. रियाजचा वारंवार आमदाराच्या पीएला फोन येत होता. त्यात तुम्हाला 100 कोटीमध्ये कॅबिनेट मंत्रिपद (Cabinet Minister) देतो अशी ऑफर दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संबंधित आमदाराने पीएच्या माध्यमातून रियाज याला 5.15 वाजता कॅफेत भेटण्यासाठी बोलावले.
त्या ठिकाणी रियाजसोबत आमदाराची बैठक झाली. रियाजने 90 कोटीमध्ये व्यवहार फिक्स केला.
मात्र 18 कोटी आगाऊ देण्यास सांगितले. आमदारांनी रियाजकडे एक दिवसांची मुदत मागून पीएला हा सर्व प्रकार सांगितला.
त्यानंतर सोमवारी (दि.18) रियाजला दुपारी 1.15 वाजता नरिमन पॉईंटला (Nariman Point) बोलावून घेतले.
त्यावेळी मुंबई क्राईम ब्रांचने सापळा रचून आमदाराला भेटण्यासाठी आलेल्या रियाजला ताब्यात घेतले.

रियाजकडे सखोल चौकशी केली असता त्याने इतर तिघांची नावे सांगितली. रियाज याने सांगितले
की, योगेशने त्याची ओळख सागरशी केली होती. आमदाराला मंत्री बनवण्यासाठी दिल्लीत 50-60 कोटी रेट आहे.
योगेशनं रियाज कडून आमदाराचा बायोडाटा मागून सागरच्या व्हॉट्सअपवर पाठवला.
सागरच्या चौकशीत त्याने जाफर उस्मानी मास्टर माईंड असल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी जाफरला अटक केली. आरोपींचे मोबाईल आणि सिम कार्ड पोलिसांनी जप्त केले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | mumbai police crime branch arrests four who made promise to provide cabinet minister post crime news

हे देखील वाचा :

Raosaheb Danve | ‘मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत गेले’ – रावसाहेब दानवे

Pune Crime | पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने चाकूने भोसकून तरुणाचा खून; पुण्याच्या वडगाव शेरी परिसरातील घटना

Pune ACB Trap | 50 हजार रुपये लाच घेताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Related Posts