IMPIMP

Maharashtra Cabinet Meeting | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय

by nagesh
Suicide Attempt Near Mantralaya | three persons from hingoli district attempted suicide near mantralaya

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) आज (गुरुवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच आजच्या बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) राज्यातील शाळा (School) सोमवार (दि.24) पासून पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु होणार असल्यातरी काही महापालिकांनी मात्र सावध भूमिका घेत शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे सांगितले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

अल्पसंख्यांक विकास
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

क्रीडा
विभागीय व जिल्हा स्तरावरील क्रीडा संकुल बांधकाम योजनेचे अनुदान वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधि व न्याय
मंगरुळपीर, जिल्हा वाशिम येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) या जोडन्यायालयांऐवजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (District and Additional Sessions Court) आणि दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर (Civil Judge Senior Level) मंगरूळपीर ही दोन न्यायालये नियमित स्वरुपात कार्यरत करून पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet Meeting)

विधि व न्याय
सावनेर, जिल्हा नागपूर येथे दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महसूल
वाळू/रेती उत्खननाबाबत नवीन एकत्रितरित्या सर्वकष सुधारीत धोरण लागू करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

जलसंपदा
12 जलसंपदा प्रकल्पांना 114 कोटी रुपयांऐवजी 324 कोटी रुपये किंमतीच्या मर्यादेत निविदा निश्चितीस मान्यता देण्यात आली आहे.

Web Title :-  Maharashtra Cabinet Meeting | 6 important decisions in the state cabinet meeting

हे देखील वाचा :

Solapur Crime | एसटी चालकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

The Great Indian Murder | ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ : अजय देवगण निर्मित वेब सिरीजच्या ट्रेलरचे जोरदार स्वागत, अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

Shaheer Shaikh’s Father Death | शाहीर शेखच्या वडिलांचे निधन, कोरोनाची झाली होती लागण

LIC Bhagya Lakshmi Plan | कमी उत्पन्न असलेल्यांसाठी LIC ची ‘ही’ योजना आहे एकदम खास, मॅच्युरिटवर मिळतो 110 टक्के रिटर्न

Related Posts