IMPIMP

Maharashtra Cabinet Meeting | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज

by nagesh
Maharashtra Cabinet Meeting | maharashtra cabinet taken important decision about heavy rains and floods affected farmers that 10000 crore fund for them

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  राज्यात यावर्षी अतिवृष्टी (heavy rain) आणि पुरामुळे (flood) शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती आणि पिकांचे नुकसान बघून अनेक शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला. अनेकांनी राज्य सरकारकडे मदतीची विनंती केली होती. राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारने (State Government) पॅकेज जाहिर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) मोठी घोषणा केली. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये (Maharashtra Cabinet Meeting) पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज (10,000 crore package) जाहीर करण्यात आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

10 हजार कोटींचे पॅकेज

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टर हून अधिक क्षेत्रावरील पीकांचे (Crops) नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या (NDRF) निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय (Maharashtra Cabinet Meeting) आज घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अशी मिळणार मदत

– जिरायतसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर

– बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर

– बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर

– ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.

Web Title : Maharashtra Cabinet Meeting | maharashtra cabinet taken important decision about heavy rains and floods affected farmers that 10000 crore fund for them

हे देखील वाचा :

Sharad Pawar | मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांचा जोरदार पलटवार

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 129 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | पुणेकरांची चिंता वाढली ! कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळली नवी बुरशी

Related Posts