IMPIMP

Maharashtra Cabinet Oath Ceremony | ठरलं ! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ‘या’ तारखेला होणार?

by nagesh
Shinde-Fadnavis Government | Another failure of the Shinde-Fadnavis government, another project lost in the hands of Maharashtra?

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Cabinet Oath Ceremony | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Government) सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झालं. मात्र, अजुनही या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. दरम्यान, या मंत्रिमंडळाच्या शपथविधी (Maharashtra Cabinet Oath Ceremony) संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. हा शपथविधी येत्या 19 जुलै रोजी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

18 जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक (Presidential Election-2022) होणार असून, त्याच्या दुसऱ्या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. राज्यात शिवसेनेतील बंडानंतर जोरदार नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अखेर एकनाथ शिंदे गट तसेच भाजप यांचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे या नव्या मंत्रिमंडळाची शपथविधी कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना हा शपथविधी 19 जुलै रोजी होणार असल्याची चर्चा आहे. मात्र राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, शिंदे आणि फडणवीस यांच्यात राज्यात तसेच दिल्लीतही बैठका पार पडल्या आहेत.
दिल्लीत अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)
यांच्या भेटीदरम्यानही मंत्रीमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, आता 19 जुलै रोजी शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title :- Maharashtra Cabinet Oath Ceremony | maharashtra cabinet expansion of eknath shinde devendra fadanvis government after presidential election

हे देखील वाचा :

Nilesh Rane | ‘… तर केसरकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत’ – निलेश राणे

Osho Teerth Park | ओशोंचे विचार संपविण्याचे विदेशीयांचे षडयंत्र; पत्रकार परिषदेत ओशो अनुयायांचा आरोप, गुरुपौर्णिमेदिवशी ओशो आश्रमाबाहेर आंदोलन

Pune Crime | शारीरीक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 33 वर्षाच्या तरुणीची 34 लाखांची फसवणूक; कोंढव्यात FIR

Related Posts