IMPIMP

Maharashtra Cabinet Reshuffle | अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळात फेरबदल?; काँग्रेसचे दोन मंत्री बदलणार तर, ‘या’ चेहर्‍यांना संधी

by nagesh
Maharashtra Cabinet Reshuffle | maharashtra cabinet will be reshuffled soon two congress ministers will be replaced praniti shinde in race

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Maharashtra Cabinet Reshuffle | महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet Reshuffle) लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसमधून (Congress) दोन मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधील एका कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्याला डच्चू देत दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत हायकमांडने परवानगी दिली असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे मंगळवारीच दिल्लीत दाखल झालेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मंत्रिमंडळातील अपेक्षित बदल तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत देखील नाना पटोले आणि इतर नेते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचे समजते.
दरम्यान, सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) रुग्णालयात उपचार घेत आहेत.
यामुळे हिवाळी अधिवेशन लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मात्र, या अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय.
एका कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्याला (Maharashtra Cabinet Reshuffle) डच्चू देऊन त्या जागी नाना पटोले (Nana Patole)
आणि सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे (praniti shinde) यांना संधी देण्याची चर्चा सुरु आहे. असं सुत्राकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद अद्याप रिक्तच आहे.
हे पद काँग्रेसकडेच जाणार हे निश्चित आहे. तसेच, फेरबदलाबाबत पटोले आणि राज्यातील काँग्रेसचे अन्य प्रमुख नेते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असून बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Maharashtra Cabinet Reshuffle | maharashtra cabinet will be reshuffled soon two congress ministers will be replaced praniti shinde in race

हे देखील वाचा :

Pune Crime | चोरट्यांचा भरदिवसा महिलेच्या दागिन्यांवर डल्ला, पुण्यातील घटना

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 64 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sulakshana Shilwant | शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश ! राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचे नगरसेवक पद रद्द; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

Related Posts